Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड बाबो! दीपिका आहे बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्री, तिच्याइतकी संपत्ती कुठल्याच ऍक्ट्रेसकडे नाही

बाबो! दीपिका आहे बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्री, तिच्याइतकी संपत्ती कुठल्याच ऍक्ट्रेसकडे नाही

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी स्वत:च्या हिमतीवर टॉपच्या अभिनेत्री म्हणून ओळख मिळवली आहे. यामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचाही समावेश होतो. दीपिका आज ज्या स्थानी आहे, तिथे पोहोचण्यासाठी तिने मोठे कष्ट घेतले आहेत. आता तिला कोणत्याही परिचयाची गरज नाही. तिने ‘राम लीला’, ‘पद्मावत’, ‘ये जवानी, है दीवानी’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘चेन्नई एक्सप्रेस’ यांसारख्या अनेक सुपरहिट सिनेमात काम केले आहे. ती इंडस्ट्रीतील दमदार अभिनेत्रींमध्ये गणली जाते. मात्र, दीपिकाची एकूण संपत्ती किती आहे आणि ती एका सिनेमासाठी किती रुपये मानधन घेते, असा प्रश्न तिचे चाहते सतत विचारत असतात. चला तर जाणून घेऊया…

किती संपत्तीची मालकीण आहे दीपिका पदुकोण?
अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) ही बॉलिवूडची सध्याच्या काळातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रत्येक निर्मात्यांची पहिली पसंती दीपिका असते. मात्र, तिच्या इतक्या जास्त मानधनामुळे प्रत्येकाला तिला आपल्या सिनेमासाठी साईन करता येत नाही. असे असले, तरीही दीपिकाच्या मानधनाबद्दल बोलायचं झालं, तर माध्यमांतील वृत्तांनुसार, दीपिका एका सिनेमासाठी जवळपास 15-30 कोटी रुपये मानधन घेते. हे मानधन दीपिकाच्या सिनेमातील पात्राच्या मुल्यावरही अवलंबून असते.

दुसरीकडे दीपिकाच्या नेटवर्थबद्दल बोलायचं झालं, तर माध्यमांतील वृत्तांनुसार, दीपिकाची एकूण संपत्ती ही जवळपास 314 कोटी इतकी आहे. विशेष म्हणजे, दीपिका ही बॉलिवूडमधील एकमेव अभिनेत्री आहे, जिची संपत्ती 300 कोटींपेक्षा जास्त आहे. ही किंमत सुपरस्टार शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्या 200 कोटींच्या ‘मन्नत’ (Mannat) बंगल्यापेक्षाही जास्त आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

दीपिकाचे आगामी सिनेमे
दीपिकाच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर आगामी काळात ती ‘पठाण’ या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत सुपरस्टार शाहरुख खान आणि जॉन अब्राहम याच्यासोबत झळकणार आहे. दीपिकाचा ‘पठाण’ हा सिनेमा पुढील वर्षी 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. तिच्या या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कलाविश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, दोन दिवसापूर्वीच केला होता 50वा बड्डे साजरा
हुमा कुरेशीला आवडत नाहीत अभिनेते? ‘ही’ अभिनेत्री आहे तिची क्रश, स्वत:च केला खुलासा
‘छीsss!’ पारंपारिक पोशाखात अभिनेत्रीने ओढली सिगारेट, हातात दारूचा ग्लास बघताच संतापले चाहते

हे देखील वाचा