Saturday, April 12, 2025
Home टेलिव्हिजन सोशल मीडियावरील ‘तो’ व्हिडिओ पाहून पवित्रा पुनिया आणि एजाज खान यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण

सोशल मीडियावरील ‘तो’ व्हिडिओ पाहून पवित्रा पुनिया आणि एजाज खान यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील आणि बिग बॉसमुळे अमाप लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री पवित्रा पुनिया नेहमीच लाइमलाईट्मधे येत असते. कधी तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे तर कधी तिच्या आणि एजाज खानच्या नात्यामुळे. ती सतत मीडियामध्ये आणि तिच्या फॅन्समध्ये गाजत असते. पवित्राने तिच्या खलनायकी भूमिकांमधून भरपूर लोकप्रियता मिळवली. आता याच पवित्राबद्दल एक बातमी समोर येत आहे. तिने सर्वांपासून लपवत लग्न केले असल्याचे सांगितले जात आहे. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यावरूनच तिने लग्न केल्याचा अंदाज लावला जात आहे.

झाले असे की अभिनेत्री पवित्रा पुनियाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने भांगेत कुंकू, लाल साडी आणि हेवी दागिने घातलेले दिसत आहे. एकदम नव्या नवरीसारखी तयार होऊन पवित्रा पोज देताना दिसत आहे. यासोबतच ती लावाच्या किनारी जनावरांना चारा खाऊ घालत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by PAVITRAA PUNIYA (@pavitrapunia_)

पवित्रच हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत असून, अनेकांनी तिला कमेंट्स करत ‘तू एजाज खानसोबत लग्न केले का?’ असा प्रश्न विचारत आहे. तर काहींनी तिला तिने हा लूक तिच्या शो साठी केला आहे का? असे देखील विचारत आहे. सोशल मीडियावरील हा व्हिडिओ पाहून सर्वांनाच त्यांनी लग्न केले का? असा प्रश्न पडत आहे. मात्र अजूनपर्यंत पवित्रा किंवा एजाज या दोघांकडूनही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान पवित्रा आणि एजाज दोघेही टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील कलाकार असून दोघांचाही चाहता वर्ग मोठा आहे. त्यामुळे या दोघांना लवकरच विवाहबंधनात बघण्याची अनेकांची इच्छा आहे. या दोघंही ऑक्टोबर २०२२ मध्ये साखरपुडा केला. त्यांची भेट बिग बॉस १४ च्या दरम्यान घरात झाली. हा शो संपत असताना दोघांनीही त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ऑस्कर पुरस्कार जिंकून भारतात परतल्यावर रामचरण झाला भावुक म्हणाला, ‘हा सिनेमा, गाणे आता आमचे नाही…’

आॅनस्क्रिन मायलेकीच्या जाेडीनं ‘नाचू किती गाण्यावर’ लावले ठुमके, व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा