Wednesday, June 26, 2024

‘…तेव्हाच ते परिपूर्ण जोडपे बनते’, म्हणत अंकिताने शेअर केले तिचे आणि शाहिरचे सुंदर फोटो

सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे १२ वर्षांनंतर पुन्हा एकदा ‘पवित्र रिश्ता २’ च्या नवीन पर्वात दिसणार आहे. लवकरच हा शो प्रदर्शित केला जाणार आहे. अंकिता देखील तिच्या या शोबद्दल खूपच उत्साहित आहे. परंतु, या शोमध्ये काम करत असताना तिला अभिनेता सुशांत सिंह राजपूतची कमतरता भासत आहे. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत सुशांत आणि अंकितानेच मुख्य भूमिका साकारली होती. अंकिता या सुपरहिट शोच्या वेब माध्यमातून डिजिटल पदार्पण करणार आहे. तिच्यासोबत अभिनेता शाहीर शेख हा ‘पवित्र रिश्ता 2.0’ च्या नवीन सीझनमध्ये ‘मानव’ ची भूमिका साकारत आहे. या शोबद्दल सतत नवीन अपडेट येत असतात. या दरम्यान, अंकिताने शाहीर शेखसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.

अंकिता लोखंडेने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये ती शाहीर शेखसोबत दिसत आहे. संपूर्ण काळ्या रंगाच्या बॅकग्राऊंडमध्ये अतिशय अंधुक प्रकाशातले त्यांचे हे फोटो खूपच सुंदर आणि लक्षवेधी ठरत आहे. या फोटोंमधून अंकिता आणि शाहिरांच्या उत्तम केमिस्ट्रीची झलक पाहायला मिळत आहे.

हा फोटो शेअर करताना अंकिताने कॅप्शनमध्ये लिहिले की, “दोन व्यक्ती जेव्हा एकमेकांचा गुणदोषांसह स्विकार करतात तेव्हाच ते परिपूर्ण जोडपे बनते.” चाहत्यांना या दोघांचे हे फोटो खूप आवडत असून या फोटोंवर त्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. चाहते दोघांच्या जोडीचे कौतुक करत आहेत. सोबतच काहींनी जुन्या मानवाच्या म्हणजेच सुशांत सिंह राजपूतच्या आठवणींना उजाळा दिला. एका युजरने प्रतिक्रिया देत लिहिले की, “सुशांत सिंग राजपूत तुझ्यावर प्रेम करत होता.”

काही दिवसांपूर्वीच ‘पवित्र रिश्ता २’ च्या ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्यावेळी, जेव्हा पत्रकार परिषदेत अंकिताला विचारण्यात आले की, ‘पवित्र रिश्ता’ च्या पर्व २ ला सुशांत सिंग राजपूतने कशी प्रतिक्रिया दिली असती. तेव्हा अंकिता म्हणाली की, “सुशांत ही बातमी ऐकूनच खूप आनंदी झाला असता. तो एकमेव व्यक्ती होता ज्याने चांगल्या कामाचे नेहमी कौतुक केले आणि त्याने मला नेहमीच प्रोत्साहित केले.”

लवकरच पवित्र रिश्ता २ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटली येणार आहे. या शोचा दुसरा पर्व ही पहिल्या पर्वासारखीच जादू करेल की नाही ही पाहण्यासारखे आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘स्पष्ट वय दिसतेय!’ म्हणून ट्रोल करणाऱ्याला सोनालीचा जोरदार पंच, म्हणाली…

-कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर ‘अशी’ झाली होती रुबीनाची हालत; म्हणाली, ‘मी पुन्हा ५० किलो वजन…’

-नेहा कक्कर आहे गरोदर? ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये देणार गोड बातमी

हे देखील वाचा