Friday, November 22, 2024
Home भोजपूरी पवन सिंगच्या ‘लेहंगवा लस लस करता’ गाण्याने मोडला विक्रम, एकाच महिन्यात मिळाले ७ कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज

पवन सिंगच्या ‘लेहंगवा लस लस करता’ गाण्याने मोडला विक्रम, एकाच महिन्यात मिळाले ७ कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज

होळीच्या सणानिमित्त अनेक गाणी रिलीझ होताना दिसत आहे. त्यात पवन सिंगची गाणी तर सगळीकडे धमाल करताना दिसत आहेत. त्याचे होळीचे गाणे तर रेकॉर्डस तोडताना दिसत आहेत. या गाण्यात तो भोजपुरी अभिनेत्री नीलम गिरीसोबत जबरदस्त परफॉर्मन्स करताना दिसत आहे. हे गाणे भलतेच व्हायरल होत आहे.

या गाण्यात त्या दोघांची केमिस्ट्री देखील खूप चांगली दिसत आहे. या गाण्यात तो केवळ होळी खेळत नाही, तर डान्स देखील करताना दिसत आहे. या दोघांचाही डान्स प्रेक्षकांना खूपच आकर्षित केले आहे. पवन सिंग आणि नीलम गिरी यांच्यावर चित्रीत झालेल्या या गाण्याचे बोल ‘लेहंगवा लस लस करता’ आहे.

या गाण्याचे लिरिक्स अरुण बिहारी यांनी लिहिले आहे. छोटे बाबा यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. हे गाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. खरं तर हे गाणे मागच्या महिन्यात रिलीझ झाले होते. परंतु होळीच्या मुहूर्तावर हे गाणे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे गाणे 12 फेब्रुवारी 2021 रोजी रिलीझ झाले आहे. या गाण्याला खूप चांगल्या लोकेशनला शूट केले आहे. या गाण्याला आतापर्यंत 7 कोटींपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि 30 लाखांपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत.

या गाण्याला खूपच पसंती मिळत असल्यामुळे या गाण्याला एका दिवसातच लाखो व्ह्यूज मिळत आहेत. हे गाणे पवन सिंग आणि आरोही भारद्वाज यांनी गायले आहे. या व्यतिरिक्त पवन सिंगचे आणखी एक गाणे रिलीझ झाले आहे. ‘लहे लहे रंगान’ हे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणे देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लहान मुलांनी प्रियांकाच्या अंगावर चक्क पाण्याने भरलेली बादली केली होती रिकामी, निक बघतच राहिला; थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल

-श्रद्धा कपूरला पाहून मुलांनी म्हटले ‘होली है’, रंगाने भरलेले फुगे पाहून घाबरली अभिनेत्री, व्हिडिओ जोरदार व्हायरल

-‘होळी पार्टीमध्ये एका व्यक्तीने माझ्या स्कर्टमध्ये हात…’, बिग बॉसची माजी कंटेस्टेंट सोफिया हयातचा धक्कादायक खुलासा

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा