टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय रियॅलिटी शो इंडियन आयडॉल १२ शेवटच्या टप्प्यावर पोहोचला आहे. या लोकप्रिय शोचा ग्रँड फिनाले १५ ऑगस्ट रोजी आहे. रविवारी (८ ऑगस्ट) शोचा सेमी फायनल होता, पण निर्मात्यांनी कोणालाही न वगळता सहा स्पर्धकांना अंतिम फेरीत प्रवेश दिला आहे. अरुणिता कांजीलाल, सायली कांबळे, पवनदीप राजन, निहाल तारो, मोहम्मद दानिश आणि शनमुखप्रिया अंतिम फेरीच्या शर्यतीत आहेत.
पवनदीप राजनला सेमीफायनलमध्ये सर्वाधिक मते मिळाली आहेत. त्याने सुरुवातीपासूनच प्रत्येकाच्या मनावर एक वेगळीच छाप मारली आहे. आता इंडियन आयडलची ट्रॉफी कोण मिळवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याआधी इंडियन आयडलच्या मंचावरून एक फोटो व्हायरल झाला होते. ज्यात पवनदीप वगळता सर्व स्पर्धक दिसत होते. ज्यामुळे पवनदीप सेमी फायनलमधून बाहेर पडल्याचा अंदाज सर्वजण बांधत होते. पण आज टेलिकास्ट केलेल्या एपिसोडमध्ये त्याला सर्वाधिक मते मिळाली आहेत.
आज प्रसारित झालेल्या भागामध्ये करण जोहरची प्रमुख उपस्थिती आहे. यातील सर्व स्पर्धकांनी एकापाठोपाठ एक शानदार कामगिरी केली. पवनदीप राजन सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंडिंगला झळकत आहे. यादरम्यान, करण जोहरने शाहरुख खानला कधी आणि कसे भेटले हे देखील सांगितले आहे. या दोघांची मैत्री इंडस्ट्रीमध्ये खूप प्रसिद्ध आहे.
‘इंडियन आयडल १२’ मधील स्पर्धकांना शो संपण्यापूर्वीच ऑफर्स मिळू लागल्या आहेत. करण जोहरने धर्मा परिवारात अरुणिता कांजिलाल आणि मोहम्मद दानिश यांचे स्वागत केल. याआधी सवाई भट्ट आणि पवनदीप राजन-अरुणितासोबतही हिमेश रेशमियाने गाणे शूट केले आहे.
जसा शोचा ग्रँड फिनाले जवळ येत आहे, तशा लोकांच्या नजरा त्याच्याशी संबंधित प्रत्येक छोट्या- मोठ्या गोष्टींकडे वेधल्या आहेत. आशिष कुलकर्णी शोमधून बाहेर पडल्यानंतर, शोला टॉप सहा स्पर्धक मिळाले. पवनदीप राजन, सायली कांबळे, निहाल, शानमुखप्रिया, अरुणिता कांजिलाल, मोहम्मद दानिश अर्थात आता यापैकी एक ग्रँड फिनालेमध्ये इंडियन आयडल १२ च्या ट्रॉफीचा मानकरी कोण असेल? हे पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये जास्तच उत्सुकता आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-इंडियन आयडलच्या ‘या’ स्पर्धकाचे फळफळले नशीब, करण जोहरकडून मिळाली थेट ‘धर्मा’साठी गाणी गाण्याची संधी
-अफेअरच्या चर्चांमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कियाराला रस्त्यावरच घेतले उचलुन, पुढे जे झाले…