Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड धक्कादायक! मनोरंजनविश्वातील ‘या’ अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केली तिची सुसाईड नोट म्हणाली, ‘माझ्या आत्महत्येला…’

धक्कादायक! मनोरंजनविश्वातील ‘या’ अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केली तिची सुसाईड नोट म्हणाली, ‘माझ्या आत्महत्येला…’

अभिनेत्री पायल घोष सतत वादांमध्ये अडकत मीडियामध्ये गाजते. मात्र तिच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे तिने सर्वांनाच हादरून सोडले आहे. पायलने काही दिवसांपूर्वी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली होती ही पोस्ट नाही तर तिची सुसाईड नोट होती. ते पाहून सर्वच हैराण झाले आणि तिच्या त्या नोटमधून तिने केलेल्या काही खुलाशांमुळे तर ग्लॅमर जगात एकच भूकंप आला आहे.

पायल घोषने तिच्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, “मी पायल घोष जर मी आत्महत्या केली किंवा जर मला हार्टअटॅक आला तर त्यासाठी ते लोकं जबाबदार असतील.” तिच्या या पोस्टनंतर तिचे फॅन्स खूपच चिंतेत होते. कमेंट्स करून सतत तिची खुशाली ते विचारत आहेत. सोबतच ‘तुझी ही नोट खरी आहे का आणि तू खरंच ठीक आहेस का?’ असे देखील प्रश्न विचारले जात आहेत. सोबतच तिला डॉक्टरांचा सल्ला आणि त्यांची मदत घेण्याचे आवाहन देखील करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Payal Ghosh (@iampayalghosh)

तत्पूर्वी जेव्हा टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माने आत्महत्या केली तेव्हा देखील तिने यावर भाष्य करत म्हटले होते की, “माहित नाही का मानसिक आरोग्याला का कमी महत्व दिले जाते.” सोबतच तिने तुनिशाच्या या पावलाला अयोग्य देखील म्हटले होते. ती हे देखील म्हणाली होती की, “नेहमीच सर्वांनी हा विचार करून सुरुवात केली पाहिजे की, आत्महत्या हा काही पर्याय नाही.”

दरम्यान पायल घोष आणि याद हे खूप जुने नाते आहे. पायलने मिटूच्या अंतर्गत तिने साजिद खानला आरोपी म्हणत त्यावर अनेक आरोप केले होते. याआधी तिने दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत शोषणाचा देखील आरोप लावला. पायलने यासाठी देखील एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात तिने विनंती करत म्हटले होते की, अनुरागने तिचे शोषण केले असून, त्याच्या विरोधात कारवाईची मागणी केली होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘झूठा’ गाण्याच्या प्रदर्शनावेळी जोरजोरात रडली राखी सावंत म्हणाली, ‘मी संसाराची स्वप्न नाही पाहू शकत का?’

जय हो..! कोट्यवधी भारतीयांना गुडन्यूज, आरआरआर चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला मिळाला मानाचा ऑस्कर पुरस्कार

 

हे देखील वाचा