Friday, November 22, 2024
Home टेलिव्हिजन पायलसोबत मंदिरात लग्न करून संग्रामला द्यायचे होते घरच्यांना सरप्राईज, पण नंतर घडले ‘असे’ काही की…

पायलसोबत मंदिरात लग्न करून संग्रामला द्यायचे होते घरच्यांना सरप्राईज, पण नंतर घडले ‘असे’ काही की…

अभिनेत्री पायल रोहतगी (Payal Rohtagi) तिचा बॉयफ्रेंड संग्राम सिंगसोबत (Sangram Singh) लग्नबंधनात अडकणार आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, तिचे वधू बनण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. अशा परिस्थितीत, अभिनेत्रीने एका ताज्या मुलाखतीत तिच्या लग्नाबद्दल सांगितले की, ती आणि संग्राम त्यांच्या पालकांसाठी हे लग्न करत आहेत.

दिल्ली एनसीआर किंवा अहमदाबाद मध्ये होईल लग्न
पायल आणि संग्राम यांना राजस्थान किंवा उत्तराखंडमध्ये लग्न करायचे होते, परंतु त्यांच्या पालकांमुळे ते दिल्ली एनसीआर आणि अहमदाबादमध्ये लग्न करण्याचा विचार करत आहेत. संग्राम म्हणाला की, दिल्लीत सर्व काही सुरळीत झाले तर ते इथेच लग्न करतील. नाहीतर अहमदाबादमध्ये, जिथे पायलचे कुटुंब राहते. संग्राम मूळचा हरियाणाचा आहे, त्यामुळे तो त्याच्या गावात एक छोटेसे सेलिब्रेशन करण्याच्या मूडमध्येही आहे. (payal rohatgi and sangram singh talk about their marriage)

संग्रामला मंदिरात किंवा कोर्टात करायचे होते लग्न
दिलेल्या लेटेस्ट मुलाखतीत पायलने सांगितले की, संग्रामला मंदिर किंवा कोर्टात लग्न करायचे होते. अभिनेत्री म्हणाली, “संग्रामला सुरुवातीला कोर्ट मॅरेज किंवा मंदिरात लग्न करून आपल्या कुटुंबीयांना आश्चर्यचकित करायचं होतं, पण मला माझ्या कुटुंबियांच्या उपस्थितीत पारंपारिक पद्धतीने लग्न करायचे होते. आमचे लग्नाचे सोहळे तीन दिवस चालतील आणि लग्नाचे विधी ९ जुलै रोजी दिवसभरात होतील.”

आई-वडिलांना खूश करण्यासाठी लग्न करत आहेत पायल आणि संग्राम
त्याच मुलाखतीत या जोडप्याने सांगितले की, ते त्यांच्या पालकांसाठी लग्न करत आहेत. पायल म्हणाली, “एक काळ असा होता, जेव्हा आमच्या कुटुंबीयांनी आमचे लग्नाचे स्वप्न सोडले होते. पण आम्हाला समजले की, आमचे पालक वृद्ध आहेत आणि त्यांना आनंदी ठेवण्यासाठी आम्हाला काहीतरी करावे लागेल. संग्रामचे लग्न पाहण्याचे त्याच्या आईचे स्वप्न आहे.”

दरम्यान पायल आणि संग्राम अलिकडेच ‘लॉक अप’ शोमध्ये दिसले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा