अभिनेत्री पायल रोहतगी हिने अभिनय आणि मॉडेलिंग करून तिचे नाव देशभर कमावले आहे. मॉडेलिंगमध्ये काम करता करताच तिने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. तिथे देखील तिने तिच्या टॅलेंटच्या जोरावर सर्वांची वाहवा मिळवली. पायल गुरवारी (9 नोव्हेंबर) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर जाणून घेऊया तिच्याबाबत काही खास गोष्टी.
पायलचा जन्म 9 नोव्हेंबर 1984 मध्ये हैदराबाद येथे झाला. या ग्लॅमरस दुनियेत तिने मॉडेलिंगमधून प्रवेश केला. तिने 2000 साली ‘फेमिना मिस इंडिया’मध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये प्रियांका चोप्रा, लारा दत्ता आणि दिया मिर्झा यांनी भाग घेतला होता. तिने 2001 मध्ये ‘मिस टूरिझम वर्ल्ड’मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि यामध्ये तिला पारितोषिक देखील मिळाले होते. यानंतर पायल अनेक जाहिरातींमध्ये झळकली. तसेच या दरम्यान तिने ‘रॉक ब्रँड सिल्क रूट’च्या एका म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले. (Payal Rohatgi birthday special : Payal always involve in controversy and arrested by police)
तिने 2002 साली ‘ये क्या हो रहा है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर तिने ‘प्लॅन’, ‘रक्त’, ‘तौबा तौबा’, ’36 चायना टाऊन’ आणि ‘दिल कब्बडी’ यांसारख्या चित्रपटात काम केले. तिने अनेक रियॅलिटी शो देखील केले आहेत. तसेच ती 2007 साली ‘फिअर फॅक्टर 2’ मध्ये दिसली होती. यानंतर तिने ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होऊन लोकांचे मनोरंजन केले आहे. यासोबतच तिने ‘राज पिछले जन्म का’, ‘हमसफर’, ‘एजेंट राघव’ आणि ‘सुर्यपुत्र कर्ण’ या मालिकांमध्ये काम केले आहे.
पायलला तिच्या करिअरमध्ये अजूनही कोणता मोठ्या चित्रपट मिळाला नाही, जेणेकरून प्रेक्षकांनी तिला त्यासाठी ओळखावे. परंतु तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अनेक मुद्यांवर तिचे मत व्यक्त करत असते.
पायलने 2019 मध्ये सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तिने भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि त्यांचे वडील मोतीलाल नेहरू यांच्याबाबत एक टिपण्णी केली होती. ज्यामुळे पोलिसांनी तिला अटक केली होते. परंतु त्यानंतर तिची जामिनावर सुटका झाली. तिच्यावर सोसायटीच्या चेअरमॅनने शिवीगाळ केल्याचा देखील आरोप केला होता.
दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर पायलने सोशल मीडियावर अनेकवेळा तिचे मत मांडले होते. त्यामुळे ती खूप चर्चेत आली होती. एवढंच नाही, तर पायल कंगना रणौतप्रमाणे बॉलिवूडमधील नेपोटिझमवरून नेहमीच बोलत असते. तिने 2012 साली दिग्दर्शक दिवारकर बॅनर्जी आणि अनुराग कश्यप यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप देखील केला होता.
हेही वाचा-
–‘या’ बॉलिवूड सुंदरींनी खाल्लीये तुरुंगाची हवा, वाचा संपूर्ण यादी
–पायल रोहतगी घेऊ शकत नाही मातृत्वाचा आनंद, तर ‘या’ कारणामुळे डॉक्टर देत नाही सरोगसी करण्यास मान्यता