Monday, January 19, 2026
Home टेलिव्हिजन पायल रोहतगी- संग्राम सिंगने लग्नापूर्वी घेतला देवाचा आशीर्वाद, ८५० वर्ष जुन्या ‘या’ मंदिराला दिली भेट

पायल रोहतगी- संग्राम सिंगने लग्नापूर्वी घेतला देवाचा आशीर्वाद, ८५० वर्ष जुन्या ‘या’ मंदिराला दिली भेट

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री पायल रोहतगी (Payal Rohatgi) आणि भारतीय कुस्तीपटू संग्राम सिंग (Sangram Singh) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. पायल आणि संग्राम शनिवारी (९ जुलै) रोजी लग्नाचे सात फेरे घेणार आहेत. अशा परिस्थितीत या दोन जोडप्यांच्या लग्नाशी संबंधित अपडेट्स सातत्याने समोर येत आहेत. दरम्यान, पायल रोहतगी आणि संग्राम सिंग लग्नाच्या एक दिवस आधी आग्रा येथील एका प्राचीन मंदिराला भेट देण्यासाठी पोहचले आहेत. ज्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

पायल आणि संग्राम देवाच्या आश्रयात
एक दशकाहून अधिक काळ एकमेकांच्या प्रेमात असलेले संग्राम सिंग आणि पायल रोहतगी आता आयुष्याच्या एका नव्या टप्प्याकडे वाटचाल करत आहेत. सध्या सोशल मीडियावर पायल रोहतगी आणि संग्राम सिंग यांच्या लग्नाची जोरदार चर्चा होत आहे. दरम्यान, या लग्नापूर्वी जोडप्याचे काही लेटेस्ट फोटोज समोर आले आहेत, ज्यामध्ये पायल आणि संग्राम देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी आग्रा येथील राजेश्वर महादेव मंदिरात पोहोचलेले दिसले. यावेळी पायल आणि संग्राम यांच्यासह दोघांचे कुटुंबीयही उपस्थित होते. (payal rohatgi sangram singh visit temple in agra before wedding)

आग्राच्या ‘या’ प्राचीन मंदिरात पोहोचले पायल-संग्राम
खरं तर, पायल रोहतगी आणि संग्राम सिंग लग्नापूर्वी आग्रा ज्या प्राचीन मंदिरात पोहोचले, ते ८५० वर्षे जुने आहे. या शिवमंदिराची ओळख खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत, पायल आणि संग्रामने आग्रा येथे लग्नाचा कार्यक्रम ठेवण्यापूर्वी राजेश्वर महादेव मंदिरात जाणे आवश्यक मानले आहे. पायल आणि संग्रामची जोडी बी-टाऊनमधील प्रसिद्ध जोडींपैकी एक आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा