Friday, March 20, 2026
Home बॉलीवूड मिर्झापूरलाही टक्कर देणारी नेटफ्लिक्सची ही सिरीज, IMDb वर 8.7 रेटिंग, तर आता ओटीटीवर धडाकेबाज एन्ट्री

मिर्झापूरलाही टक्कर देणारी नेटफ्लिक्सची ही सिरीज, IMDb वर 8.7 रेटिंग, तर आता ओटीटीवर धडाकेबाज एन्ट्री

आजकाल ott प्लॅटफॉर्म वरती अनेक प्रकारचे कंटेंट उपलब्ध आहेत. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू झाल्यापासून अनेक प्रेक्षक हे घरबसल्या जे पाहिजे ते पाहू शकत आहेत. त्यामुळे ott कंटेंटचा क्रेझ वाढत आहे. तसेच बॉलिवूड चित्रपट सोबतच वेबसीरीजनी सुद्धा आपले स्थान निर्माण केले आहे. अशीच एक वेबसीरिज म्हणजे मिर्झापूर ही सिरीज इतकी गाजली की आता याचा चित्रपट ही येत आहे. तसेच या सीरिजला मागे टाकणारी अजून एक सिरीज आली आहे. आणि त्याचे 6 सीजन सुपरहिट ठरले, आणि त्यावर आता एक चित्रपट बनवला गेला आहे तर या चित्रपटाचे नाव पीकी ब्लाइंडर्स: द इमॉर्टल मॅन हे आहे.

पीकी ब्लाइंडर्स: द इमॉर्टल मॅन या आयएमडीबीवर 8.7  रेटिंग चित्रपटाला मिळाली आहे. तर हा चित्रपट आज म्हणजेच 20 मार्च 2026 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. किलियन मर्फी मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट, ‘पीकी (peaky)ब्लाइंडर्स’ टीव्ही मालिकेचा अधिकृत सिक्वेल आहे. हा चित्रपट 6 मार्च 2026 रोजी निवडक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र आता तुम्ही नेटफ्लिक्स मधून घरबसल्या हा चित्रपट पाहू शकतात.

बॉलीवूड मालिका, ‘मिर्झापूर’, देखील हिट झाली. या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळाला आणि तिची पात्रे सोशल मीडियावर लोकप्रिय झाली. मात्र हे लक्षात घेण्यासारखे आहे की ‘मिर्झापूर’चे IMDb रेटिंग ‘पीकी ब्लाइंडर्स’पेक्षा कमी आहे. आयएमडीबीवर मिर्झापूरला 8.4 रेटिंग आहे, तर पीकी ब्लाइंडर्सला 8.7 रेटिंग असून ते मिर्झापूरपेक्षा 0.3 ने जास्त आहे. मिर्झापूर मालिकेवर आधारित एक चित्रपटही बनवला जात असून तो लवकरच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होईल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

धुरंदर 2 मध्ये बडे साहेबचा खुलासा, इमरान, सलमान खान नव्हे, या अभिनेत्याने साकारली डॉनची भूमिका

हे देखील वाचा