बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी हिचे पती राज कौशल यांचे बुधवारी (३० जून) रोजी सकाळी, हृदय विकाराचा झटका येऊन मृत्यू झाला आहे. माध्यमातील वृत्तानुसार, राज कौशल यांचे निधन पहाटे ४:३० वाजता झाले आहे. त्यांच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. परंतु बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी हिने ज्याप्रकारे दुःख व्यक्त केले आहे. ते लोकांना अजिबात आवडले नाही. लोकांनी या गोष्टीला असंवेदनशील म्हटले आहे. त्यामुळे ती सध्या सोशल मीडियावर जोरदार ट्रोल होत आहे.( People get angry with Mahima Chaudhary’s reaction of death of Raj kaushal)
बुधवारी जेव्हा मंदिरा बेदीच्या घरावर दुःखाचं सावट पसरलं होत, त्याचवेळी महिमा तिच्या मुलांसोबत बाहेर फिरायला गेली होती. तिने पॅपराजींना पोझ पण दिल्या होत्या. महिमा आणि राज कौशल हे दोघे ही खुप चांगले मित्र होते. तिने सोशल मीडियावर दु:ख देखील व्यक्त केले होते. परंतु पॅपराजींनी जेव्हा महिमाला राजबाबत विचारले, तेव्हा तिने अशा प्रकारे दुःख व्यक्त केले, जे लोकांना फारसं आवडलं नाही.
यावेळी महिमा जेव्हा राजबद्दल बोलत होती, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य होते. तिने राज यांचा जुना फोटो दाखवून सांगितले की, ती त्यांना खूप आधीपासून ओळखत होती. तिने मंदिरा बेदी आणि तिच्या मुलांबाबत देखील दुःख व्यक्त केले होते.
व्हिडिओमध्ये महिमाच्या चेहऱ्यावर दुःख नाही, तर आनंद दिसत होता. त्यामुळे ती जोरदार ट्रोल झाली आहे. या व्हिडिओवर अनेक कमेंट्स येत आहे. कोणी म्हणत आहे, हे खूप असंवेदनशी आहे. तर कोणी विचारत आहे, महिमा चौधरीला खरंच दुःख झाले आहे का?? या व्हिडिओच्या शेवटी महिमा हे देखील म्हणते की, लॉकडाऊन संपल्यावर ती मंदिरा बेदी आणि मुलांना भेटायला घरी जाणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
‘मिनिमून’ साजरा केल्यानंतर, सोनाली कुलकर्णी त्याच उत्साहात पुन्हा कामावर झाली रुजू