साऊथचे सुपरस्टार अभिनेते प्रभास(Prabhas), सैफ अली खान(Saif Ali Khan) आणि क्रिती सेनन(Kirti Sanon) यांच्या आगामी ‘आदिपुरुष’ या चित्रपटाबाबत वाद वाढतच आहेत. ‘रामायण’वर आधारित या चित्रपटात व्हीएफक्स आणि भगवान हनुमानाच्या पोशाखाबाबत अनेक प्रकारचे आक्षेप समोर येत आहेत, त्यामुळे आदिपुरुषच्या निर्मात्याच्या अडचणी वाढणतच आहेत. आता दिल्लीतील एका कोर्टात या सिनेमाविरोधात याचिका दाखल करण्यात आली असून त्यात सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदीची मागणी केली जातेय.
दिग्दर्शक ओम राऊत याच्या ‘आदिपुरुष’ सिनेमाचा टीझर आठवड्याभरापूर्वीच रिलीज झाला आणि सगळा वाद सुरु झाला. कितीतरी हिंदू संघटनांनी सिनेमावर हिंदू धर्माचा अवमान केल्याचे आरोप लावले आहेत. चित्रपटाच्या टीझर व्हिडिओच्या निर्मात्यांनी हिंदू देवतांचे “अयोग्य” आणि “चुकीचे” चित्रण केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश अभिषेक कुमार सोमवारी या प्रकरणावर सुनावणी करणार आहेत. शुक्रवारी अधिवक्ता राज गौरव यांनी दाखल केलेल्या याचिकेत निर्माता भूषण कुमार आणि दिग्दर्शक आणि सहनिर्माता ओम राऊत यांच्या चित्रपटाला कायमस्वरूपी आणि अनिवार्य स्थगिती देण्याची मागणी केली आहे.
आदिपुरुष या चित्रपटात मिश्या नसलेल्या दाढीवाल्या हनुमानाला सुद्धा लोक नाव ठेवताना दिसत आहे. त्याच्या अंगावर चामड्याचा बेल्ट दिसतेय. हिंदू देवांना चुकीच्या पद्धतीने दाखवत चित्रपटात प्रभु रामचंद्रांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या प्रभासला मिश्या दाखवल्यात ते देखील लोकांना पटलं नाही आहे. त्याचबरोबर रावण्याची भूमिका साकारणाऱ्या सैफ अली खानला तर खूपच हेटाळणी सहन करावी लागत आहे. नेटकऱ्यांनी म्हटलं की, चित्रपटामध्ये रामयणाचं इस्लामीकरण केल्याची झलक पहायला मिळतेय.
निर्मात्यांनी त्यांच्या आगामी आदिपुरुष चित्रपटाच्या टीझर व्हिडिओमध्ये हिंदू देवता भगवान राम आणि भगवान हनुमान यांचे चित्रण करून फिर्यादी आणि इतर हिंदूंच्या धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सभ्यतेच्या भावना दुखावल्या आहेत. तर भगवान रामाचे पारंपारिक चित्र क्षमेवर विश्वास ठेवणाऱ्या शांत आणि साध्या माणसाचे होते. चामड्याचा पट्टा आणि आधुनिक लेदर शूज परिधान करून, त्याला अत्याचारी, सूडखोर आणि क्रोधित म्हणून चित्रपटात दाखवले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा –
केबीसीमध्ये जया बच्चन यांनी केला असा खुलासा, बिग बीच्या अश्रूचा बांध फुटला!
फॅन मूव्हमेंट! मनित जौरा म्हणाला,’संजय दत्तला पाहून…’