Monday, June 9, 2025
Home अन्य बंगालची ‘ब्यूटी क्वीन’ रायमा सेन दिसली टॉपलेस अंदाजात; फोटोवरून नजर हटवणे होईल कठीण!

बंगालची ‘ब्यूटी क्वीन’ रायमा सेन दिसली टॉपलेस अंदाजात; फोटोवरून नजर हटवणे होईल कठीण!

बंगालची ‘ब्यूटी क्वीन’ रायमा सेन ही सध्या तिच्या ताज्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. टॉपलेस स्टाईलमध्ये केलेले फोटोशूट पाहून चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत. त्याचबरोबर काही युजर्सने तिला ट्रोलही केले आहे. वयाच्या ४१ व्या वर्षी रायमाने इतक्या हॉट लूकमध्ये केलेल्या फोटोशूटमध्ये, ती बरीच सुंदर आणि खूप फिटही दिसत आहे.

बंगाली चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये काम करणारी रायमा इंस्टाग्रामवर बरीच सक्रिय असते आणि बर्‍याचदा तिच्या फोटोशूटचे काही फोटोही शेअर करते. ज्यात कधी तिचे पारंपरिक, तर कधी स्टायलिश आणि बोल्ड फोटोशूट पाहायला मिळते. त्याचबरोबर चाहते देखील तिला भरभरून लाईक्स आणि कमेंट्स देतात. अशा परिस्थितीत तिचे टॉपलेस फोटोही खूप पसंत केले जात आहेत.

https://www.instagram.com/p/CPItP9lrbJ0/?utm_source=ig_web_copy_link

रायमा सेनचे हे फोटो तथागत घोष या फोटोग्राफरने कॅमेर्‍यामध्ये कैद केले आहेत, ज्यामध्ये ती तिची परफेक्ट बॅक आणि फिगर दाखवताना दिसत आहे. मेकअपबद्दल बोलायचे झाले, तर रायमा अनेकदा स्वत: वर मेकअपचे प्रयोग करताना दिसते. परंतु यावेळी, तिने साधे काजळ आणि न्यूड शेड लिपकलरसह फ्लॉलेस बेस मेकअप केला आहे. मोकळ्या केसांमध्ये रायमा बऱ्यापैकी बोल्ड दिसत आहे.

यापूर्वी रायमाने बर्‍याचदा ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. अलीकडेच ती रंगीबेरंगी ब्लॉक प्रिंट्सच्या ड्रेसमध्ये दिसली होती. यामध्ये तिचा मेकअपही खूप क्लासी दिसत होता. क्रिमसन लाल लिपस्टिक आणि हलके लहरी केस असलेले असा लूक केलेली रायमा या फोटोंमध्ये खूपच आकर्षक दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CPGXEg-rS6t/?utm_source=ig_web_copy_link

रायमा सेनच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने बंगाली चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटांतही काम केले आहे. तसेच, ती वेब सीरिजकडे देखील वळली आहे आणि लवकरच ती ओटीटीवर दिसण्यास सज्ज झाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फिटनेस असावा तर असा! शाहिद कपूरची पत्नी मीराने केला आंब्याच्या झाडाला लटकून व्यायाम; एकदा पाहाच

-सनी लिओनीने चाहत्यांना दिले ‘हे’ खतरनाक चॅलेंज, भल्या- भल्यांना फुटेल घाम घाम

-अरे व्वा! आणखी ७८ वर्षे सोनी मॅक्सवर दिसणार ‘सूर्यवंशम’ चित्रपट, कारणही आहे तितकंच रंजक

हे देखील वाचा