Tuesday, January 14, 2025
Home बॉलीवूड शिल्पा शेट्टीच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन! व्हिलचेअरवर असूनही अभिनेत्रीने केले असे जल्लोशात स्वागत

शिल्पा शेट्टीच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन! व्हिलचेअरवर असूनही अभिनेत्रीने केले असे जल्लोशात स्वागत

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) ‘इंडियन पोलिस फोर्स’ या वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान एक अपघात झाला, ज्यामध्ये शिल्पा शेट्टीचा पाय फ्रॅक्चर झाला. तेव्हापासून अभिनेत्री बेड रेस्टवर आहे. दरम्यान, शिल्पा शेट्टीचा काही फोटो समोर आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिल्पा शेट्टीने आपल्या घरी गणपतीचे स्वागत केले आहे. मोठी गोष्ट म्हणजे शिल्पाच्या तिच्या तुटलेला पाय असून सुध्दा मोठ्या धूमधडाक्यात बाप्पाचे आगमन केले. 

शिल्पा शेट्टी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि फिटनेसमुळे ती सिने जगतात नेहमीच चर्चेत असते. सध्या शिल्पा तिच्या आगामी इंडियन पोलिस फोर्स या वेबसिरीजमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. शिल्पा शेट्टीची देवावर नितांत श्रद्धा असून ही अभिनेत्री नेहमीच पूजा करताना दिसते. शिल्पा शेट्टी दरवर्षी गणपतीला तिच्या घरी आणून त्याची सेवा करते आणि नंतर त्याचे विसर्जन करते.

शिल्पा शेट्टीच्या पायाला दुखापत झाल्याने राज कुंद्राने गणेशजींना कारमध्ये घरी आणले आहे. यानंतर अभिनेत्री पूजेचे ताट घेऊन घराबाहेर पडली आणि आरती करून बाप्पाचे स्वागत केले. यावेळी राज कुंद्रा यांनी नारळही फोडला.

शिल्पा पुन्हा एकदा चित्रपटांकडे वळली आहे. पण चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी शिल्पाने स्वत:साठी अनेक प्रकारचे व्यवसायही उघडले आहेत. शिल्पा शेट्टीच्या नावावर अनेक रेस्टॉरंट आहेत. याशिवाय ती स्वतःचे यूट्यूब चॅनलही चालवते. शिल्पा सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातूनही भरपूर कमाई करते. इतकंच नाही तर तिने अनेक शोज जजही केले आहेत, पण आता तिच्या मुलानेही तिचा मार्ग फॉलो करत वयाच्या अवघ्या 10 व्या वर्षी आपला व्यवसाय सुरू केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
रुपाली भोसलेचा मराठमोळा लूक
श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूरच्या दिग्दर्शकावर लागला पेमेंट न देण्याचा आरोप; म्हणाले, ‘हे सगळं खोटं आहे’
मुलगा पाहिजे की मुलगी? बिपाशा बासूने स्पष्टचं सांगितले

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा