बॉलिवूड कलाकारांची प्रत्येक गोष्ट चाहत्यांना जाणून घ्यायची असते. मग त्यांचे घर असो, त्यांचे चित्रपट असो किंवा मग त्यांची कार असो. कलाकारांच्या घरांबाबत बोलायचं झालं, तर त्यांचे घर हे प्रशस्त, आलिशान, अनेक सुखसुविधांनी पूर्णपणे भरलेले असते. त्यांच्या दारावर लागणारी नेम प्लेटही तितकीच आकर्षणाचा विषय ठरत असते. अशातच आता बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या घराची नेम प्लेट सध्या चर्चेत आहे.
खरं तर भारतीय संघ राहत असलेल्या अहमदाबादमधील हॉटेलने खेळाडूंना घरच्या वातावरणाचा आभास व्हावा, म्हणून एक खास शक्कल लढवली आहे. हॉटेल व्यवस्थापनाने खेळाडूंना घरच्यासारखे वातावरण मिळावे, म्हणून ते राहत असलेल्या हॉटेल रूमला नंबर देणे टाळले आहे. नंबर ऐवजी हॉटेल रूमच्या दारावर खेळाडूंच्या आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या पाट्या लावण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे विराट कोहलीच्या रूमच्या दारावर त्याचे नाव, पत्नी अनुष्का शर्माचे नाव आणि याशिवाय त्यांची दोन महिन्यांची मुलगी वामिका, यांचे नाव लिहिण्यात आले आहे. अनुष्का आणि विराटच नव्हे, तर इतर खेळाडूंच्याही घरावर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या नावाची नेम प्लेट लावण्यात आली आहे.
या तिघांचे नाव असलेल्या पाटीचा फोटो सोशल मीडियावर देखील वेगाने व्हायरल होत आहे.
अनुष्का आणि विराट यांनी अनेक वर्षांच्या डेटिंगनंतर ११ डिसेंबर २०१७ रोजी इटलीमध्ये लग्न केले होते. खासगी समारंभात झालेले हे लग्न चांगलेच चर्चेचे विषय ठरले होते. ऑगस्ट २०२० मध्ये विराट आणि अनुष्काने घोषणा केली होती की, ते लवकरच आई-वडील होणार आहेत.
अनुष्काने सन २००८ साली सुपरस्टार शाहरुख खानसोबत ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली होती. यानंतर तिने अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. यामध्ये ‘पीके’, ‘सुल्तान’ या चित्रपटांचा समावेश आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-गदरमध्ये ज्याने सनी-अमिषाच्या मुलाची भूमिका केली आता तोच होणार गदर दोनचा हिरो, पाहा कोण आहे ‘तो’
-लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्मृती इराणींनी हटके अंदाजात दिल्या पतीला शुभेच्छा