Friday, May 9, 2025
Home हॉलीवूड गणेशा तुझा मला छंद..! ही परदेशी अभिनेत्री आहे कट्टर गणेश भक्त, भींतीवर लावलाय श्रींचा फोटो

गणेशा तुझा मला छंद..! ही परदेशी अभिनेत्री आहे कट्टर गणेश भक्त, भींतीवर लावलाय श्रींचा फोटो

भारतीय संस्कृतीवर संपुर्ण जग प्रभावित असून, हिंदू देवदेवतांचे भक्त जगभर आहेत. नेटफ्लिक्सच्या लोकप्रिय शो ‘मनी हाईस्ट’ची अभिनेत्री ॲस्टर एसेबो (Aster Asebo) हिच्या घरी गणपतीचा फोटो दिसला, तेव्हा त्याचे वैशिष्ट्य दिसून आले. यानंतर हा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ॲस्टरच्या घराच्या भिंतीवर गणपतीचा फोटो पाहून भारतीयांना अभिमान वाटत आहे. हा फोटो पाहून भारतातील लोकांना खूप आनंद झाला आहे.

पैशाची चोरी करणारी अभिनेत्री गणपतीची भक्त!
ॲस्टरने (Aster Acebo) ‘मनी हाईस्ट’मध्ये मोनिकाची भूमिका केली होती. या फोटोमध्ये ती स्वत:साठी चहा किंवा कॉफी बनवत होती. तेव्हा तिच्या भिंतीवर गणपतीचा फोटो दिसत होता. हा फोटो समोर आल्यानंतर भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे लोक म्हणत आहेत. हा फोटो समोर आल्यानंतर लोक म्हणत आहेत की, ॲस्टर ही गणपतीचा भक्त आहे. नेटफ्लिक्सच्या ‘मनी हाईस्ट’ शोमध्ये मोनिकाची भूमिका साकारल्यानंतर ॲस्टरला जगभरात खूप लोकप्रियता मिळाली आहे. तिची व्यक्तिरेखा चाहत्यांना खूप आवडली आहे.

जगभरात आहेत मनी हाईस्टचे चाहते
‘मनी हाईस्ट’ हा एक स्पॅनिश शो आहे, ज्याला जगभरात खूप लोकप्रियता मिळाली. भारतातही या शोला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. शोचा शेवटचा सीझन दोन भागात प्रदर्शित झाला आहे. ‘मनी हाईस्ट’च्या प्रत्येक सीझनची चाहत्यांनी आतुरतेने वाट पाहिली. त्यामुळे या शोच्या शेवटच्या सीझननंतर चाहत्यांची निराशा झाली आहे. ‘मनी हाईस्ट’चा हिंदी रिमेक गेल्या वर्षीच जाहीर झाला होता. त्याचे नाव ‘थ्री मंकी’ आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल प्रोफेसरच्या भूमिकेत दिसणार आहे. अब्बास मस्तान ‘थ्री मंकी’ दिग्दर्शित करत आहेत.

सोशल मीडियावर आहे खूप सक्रिय
अलिकडेच, अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती की, “जेव्हा शंका असेल तेव्हा लाल ड्रेस परिधान करा, सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा! भरपूर प्रेम.” ॲस्टर एसेबो तिच्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांची यादी खूप मोठी आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा