एक नवीन टीव्ही शो लवकरच छोट्या पडद्यावर दाखल होण्यासाठी सज्ज आहे. ‘पिशाचिनी’ नावाचा नवीन हॉरर शो लवकरच कलर्स टीव्हीवर प्रसारित होणार आहे. शोचा अधिकृत ट्रेलरही रिलीझ झाला आहे, ज्याची एक झलक पाहिल्यानंतर चाहत्यांची चांगलीच घाबरगुंडी उडाली आहे. हा शो खूपच रोमांचक असेल. शोमध्ये नायरा बॅनर्जी (Nayra Banerjee) मुख्य भूमिकेत आहे, जी पिशाचिनीची भूमिका साकारताना दिसत आहे. हा एक सुपर नॅचरल टीव्ही शो असेल, ज्यामध्ये मुख्य लक्ष भूत प्रेत आणि पिशाचिनीवर असेल.
‘पिशाचिनी’चा ऑफिशियल प्रोमो रिलीज झाला आहे, ज्यामध्ये डायनची झलक पाहून प्रेक्षक थक्क झाले आहे. प्रोमोच्या सुरुवातीला एक मुलगी म्हणजेच, अभिनेत्री जिया शंकर (Jiyaa shankar) अभिनेता हर्ष राजपूतला (Harsh Rajput) फुले देत आहे. तेव्हा दोघांच्या प्रेमकथेवर पिशाचिनीची वाईट नजर पडते. शोचा ट्रेलर खूपच भीतीदायक आणि सस्पेन्सने भरलेला आहे. (pishachini trailer out on you tube)
‘पिशाचिनी’मध्ये जिया शंकर आणि अभिनेता हर्ष राजपूत यांना मुख्य भूमिकेत साईन करण्यात आले आहे. नायरा बॅनर्जी या शोमध्ये राणीच्या भूमिकेत दिसणार आहे. जिया शंकरला पवित्राची भूमिका मिळाली आहे. यासोबतच अरिजित तनेजाही या शोमध्ये नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. अमित भेल आणि अंजली गुप्ता या शोमध्ये दिसणार असल्याचीही बातमी आहे.
या मालिकेची टॅग लाइन ‘खूबसुरती एक चाहलवा है, मौत का बुलावा है’ पिशाचिनी शोभोवती फिरते, जिथे मुलगी देवदूत असल्याचे भासवते आणि वास्तविक वेशात एक सैतान असते. पिशाचिनी शोची ही मुख्य कथा असेल.
मात्र, ‘पिशाचिनी’चा प्रोमो पाहताना खूपच आशादायक दिसते. हा शो दर शनिवार आणि रविवारी रात्री ८ वाजता प्रसारित होईल. असे म्हटले जात आहे की, हा शो ‘नागिन ६ ची’ जागा घेऊ शकतो. ‘पिशाचिनी’ कलर्स टीव्हीवर ८ ऑगस्टपासून रात्री १० वाजता प्रसारित होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा