Wednesday, August 13, 2025
Home टेलिव्हिजन पंतप्रधान मोदी, अमित शहानीं पाहिला ‘स्वराज’ मालिकेचा एपिसोड, जाणून घ्या ७६ भागाच्या ‘स्वराज’ मालिकेचे महत्व

पंतप्रधान मोदी, अमित शहानीं पाहिला ‘स्वराज’ मालिकेचा एपिसोड, जाणून घ्या ७६ भागाच्या ‘स्वराज’ मालिकेचे महत्व

दूरदर्शनवर ‘स्वराज – द समग्र गाथा ऑफ इंडियाज फ्रीडम स्ट्रगल’ ही मालिका सुरू झाली असून या मालिकेचे स्क्रीनिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी ठेवण्यात आले होते. बुधवारी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या केंद्रीय मंत्र्यांसह संसद ग्रंथालय इमारतीच्या सभागृहात ही मालिका पाहिली. या स्क्रीनिंगचे आयोजन दूरदर्शनने केले होते. विशेष स्क्रीनिंगमध्ये पंतप्रधान मोदींसोबत गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते.

संध्याकाळी या धाराविकच्या स्क्रीनिंगला पंतप्रधान मोदी त्यांच्या मंत्रिमंडळासह उपस्थित होते. यावेळी पीएम मोदी चेहऱ्यावर मास्क घातलेले दिसले. मिळालेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी दोन भागांचे स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. 14 ऑगस्ट रोजी दूरदर्शनच्या ‘स्वराज: भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाची समग्र गाथा’ या मालिकेचा लॉन्चिंग आणि विशेष स्क्रीनिंग कार्यक्रम नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे होते.

‘स्वराज’ ही 75 भागांची मालिका आहे, जी 15 व्या शतकापासून भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा गौरवशाली इतिहास दाखवेल. आजच्या पिढीला ज्यांच्याबद्दल नीट माहिती नाही अशा वीरांचे जीवन आणि बलिदान लोकांना सांगणे हा ही मालिका दाखवण्याचा उद्देश आहे. ही मालिका दर रविवारी रात्री 9 ते 10 या वेळेत दूरदर्शन नॅशनलवर प्रसारित केली जाईल. या मालिकेचा पहिला भाग १४ ऑगस्ट रोजी प्रसारित झाला आहे. विशेष म्हणजे ही मालिका फक्त इंग्रजी सोबतच तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम या भाषांमध्ये प्रसारित केली जात आहे.

हेही वाचा – सिक्सपॅक दाखवत टायगर श्रॉफने समुद्रकिनारी दिल्या खतरनाक पोझ, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल
भल्या भल्या बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देते पाकिस्तानची ‘ही’ सुंदरी, फोटो पाहून फुटेल घाम
‘आमिर खानला बॉयकॉट करायचं नाही!’ एकता कपूरचा मोठा खुलासा

हे देखील वाचा