Friday, February 21, 2025
Home बॉलीवूड कोणासाठी दैवी अवतार तर कोणासाठी अच्छे दिनाचे अग्रदूत, बॉलिवूड कलाकारांच्या पंतप्रधानांना खास शुभेच्छा, पाहा पोस्ट

कोणासाठी दैवी अवतार तर कोणासाठी अच्छे दिनाचे अग्रदूत, बॉलिवूड कलाकारांच्या पंतप्रधानांना खास शुभेच्छा, पाहा पोस्ट

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज (17, सप्टेंबर) वाढदिवस आहे.  या खास प्रसंगी देश-विदेशातील बडे सेलिब्रिटी आणि फॉलोअर्स त्यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. बॉलीवूडचे स्टार्सही पंतप्रधानांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा देत आहेत. अमिताभ बच्चनपासून ते अनुपम खेर, अक्षय कुमार, कंगना राणौतपर्यंत सर्वांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करून पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या आहेत. पाहूया कलाकारांच्या या खास पोस्ट.

अक्षय कुमार  – अभिनेता अक्षय कुमनने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने पीएम मोदींसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यासोबत त्याने ” ‘तुमची दृष्टी, कळकळ आणि तुमची काम करण्याची क्षमता… आणि अशाच काही गोष्टी मला खूप प्रेरित करतात. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मी तुम्हाला आरोग्य, आनंद आणि पुढील गौरवशाली वर्षासाठी शुभेच्छा देतो.” असा संदेश दिला आहे.

कंगना राणौत – अभिनेत्री कंगना रणौतने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून पंतप्रधानांचे अभिनंदन केले आहे. ज्यामध्ये तिने ‘अद्भुत पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. लहानपणी रेल्वे प्लॅटफॉर्मवर चहा विकण्यापासून ते आज जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती बनण्यापर्यंतचा तुमचा प्रवास अविश्वसनीय आहे. आम्ही तुम्हाला दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतो, पण रामाप्रमाणे, कृष्णासारखे, गांधीसारखे, तुम्ही अमर आहात. तुमचा वारसा कोणीही पुसून टाकू शकत नाही, म्हणूनच मी तुम्हाला अवतार समजते असा संदेश दिला आहे.

kangana ranaut wishesh narendra modi
Photo Courtesy Kangana Ranaut

अनुपम खेर – अभिनेता अनुपम खेर यांनीही ट्विट शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये पंतप्रधान मोदी त्यांच्या पदाची शपथ घेताना दिसत आहेत. यासोबत अनुपम खेर यांनी लिहिले आहे की, “आदरणीय पंतप्रधान! तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! परमेश्वर तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य देवो! तुमच्या शपथेची जबाबदारी पार पाडण्यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहात. वर्षानुवर्षे करत राहणार! तुमच्या नेतृत्वाबद्दल धन्यवाद! पंतप्रधान मोदीजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!”

सनी देओल – अभिनेता सनी देओलनेही पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिले, “आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, निरोगी राहा आणि पुढचे वर्ष खूप चांगले जावो, हीच माझी इच्छा आहे.”

अनिल कपूर- अभिनेता अनिल कपूरने ट्विटरवर त्यांच्यासोबतचे दोन फोटो शेअर करून पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आहे. ज्यामध्ये लिहिले आहे की, “ज्या व्यक्तीने भारताला जगाच्या नकाशावर इतक्या उंचीवर नेऊन ठेवले आहे, ज्याची आपण कल्पनाही केली नसेल…अच्छे दिनांचे आश्रयदाता, आपल्या अभिमानास्पद राष्ट्राच्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तम्हाला  दीर्घायुष्य लाभो आणि निरोगी राहा.”

विवेक अग्निहोत्री- दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. सोबतच त्यांनी   माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि सदैव निरोगी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. एक नवी चेतना जी माननीय पंतप्रधानांनी भारतात जागृत केली आहे. भारतीयांनी जो नूतन उत्साह आणि मनोबल वाढवले ​​आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. असाच उत्साहाने काम करत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. विशेषत: भारतातील वंचित आणि शोषितांच्या उन्नतीसाठी असेच कार्य करत रहा. देव भारताची भरभराट होवो आणि देशाला पुढे नेण्याचे काम करत राहो. अशा शब्दात नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा-
मीरा राजपूतच्या लूकवर नेटकरी फिदा; म्हणाले, ‘भाभी जी घर पर है’
‘श्रीराम आणि कृष्णासारखं तुम्हीही…’, कंगणा रणौतने पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा, पाहा व्हायरल पोस्ट
आईच्या हट्टाने सनाया ईरानी झाली अभिनेत्री, पुढे मोहित सेहगलसोबत थाटला संसार

हे देखील वाचा