Thursday, January 8, 2026
Home साऊथ सिनेमा पोंगल आठवड्यात होणार महाक्लॅश; बॉक्स ऑफिसवर दोन सुपरस्टार्स आमनेसामने, कोणाला मिळणार प्रेक्षकांचं प्रेम?

पोंगल आठवड्यात होणार महाक्लॅश; बॉक्स ऑफिसवर दोन सुपरस्टार्स आमनेसामने, कोणाला मिळणार प्रेक्षकांचं प्रेम?

बॉक्स ऑफिसवर 2026ची सुरुवात काहीशी संमिश्र ठरत असताना, दक्षिण भारतीय सिनेसृष्टी मात्र नव्या वर्षाचे जोरदार स्वागत करताना दिसत आहे. बॉलिवूडमध्ये ‘इक्कीस’कडून अपेक्षा पूर्ण न झाल्या असल्या, तरी 2025 मध्ये प्रदर्शित झालेला ‘धुरंधर’ अजूनही कमाईचा धडाका लावत आहे. दरम्यान, साऊथ इंडस्ट्रीत पोंगल आठवड्यात दोन महासुपरस्टार्स आमनेसामने येत असल्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

9 जानेवारी 2026 रोजी सिनेमागृहात दोन मोठ्या चित्रपटांचा क्लॅश होणार आहे. एकीकडे प्रभासचा ‘द राजा साब’ तर दुसरीकडे थलापति विजयचा ‘जना नायकन’. दोन्ही चित्रपट वेगवेगळ्या शैलीतील असले, तरी त्यांची थेट टक्कर चर्चेचा विषय ठरली आहे. ‘द राजा साब’ हा हॉरर-कॉमेडी प्रकारातील चित्रपट आहे, तर ‘जना नायकन’ (Jana Nayagan)हा राजकीय अ‍ॅक्शन थ्रिलर आहे.

मारुती दिग्दर्शित ‘द राजा साब’मध्ये प्रभाससोबत संजय दत्त, निधी अग्रवाल, मालविका मोहनन, बोमन इराणी आणि जरीना वहाब महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सुमारे 400 कोटी रुपयांच्या भव्य बजेटमध्ये तयार झालेला हा हॉरर-कॉमेडी चित्रपट अनेकदा पुढे ढकलण्यात आला होता. अखेर पोंगलच्या मुहूर्तावर 9 जानेवारी 2026 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रभासच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता आहे.

त्याच दिवशी थलापति विजयचा ‘जना नायकन’ही प्रदर्शित होत आहे. अलीकडेच रिलीज झालेल्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. हा चित्रपट विजयच्या चाहत्यांसाठी खास आहे, कारण ही त्यांची शेवटची चित्रपट भूमिका ठरणार आहे. यानंतर थलापति विजय पूर्णवेळ राजकारणात सक्रिय होणार आहेत.

या चित्रपटाबद्दल चर्चेची अनेक कारणे आहेत. एक म्हणजे विजयची ही शेवटची फिल्म, दुसरे म्हणजे हा नंदमुरी बालकृष्ण यांच्या ‘भगवंत केसरी’चा रिमेक असल्याची चर्चा आहे. ट्रेलरमधील काही दृश्यांमुळेही या चर्चांना उधाण आले आहे. तिसरे आणि सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे प्रभासच्या ‘द राजा साब’सोबत होणारी थेट बॉक्स ऑफिस टक्कर.

पोंगलच्या सणात प्रभास आणि थलापति विजय यांच्यातील हा महासंग्राम दक्षिण भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात मोठ्या क्लॅशपैकी एक मानला जात आहे. हॉरर-कॉमेडी विरुद्ध राजकीय अ‍ॅक्शन थ्रिलर—प्रेक्षक कोणाला पसंती देतात, हे 9 जानेवारीनंतरच स्पष्ट होईल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा
थलपति विजयची पत्नी: रोज चिट्ठ्या पाठवणारी फॅन गर्ल, नंतर आयुष्यभराची ठरली सोबती

हे देखील वाचा