‘माझ्या काळात वर्जिन असणं खूप महत्त्वाचं होतं अन् आता…’, अभिनेत्री पुजा बेदीने मुलगी अलायाबद्दल केलं मोठ भाष्य

काय सांगता!! दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा नातवासोबत रंगल्या आहेत अलायाच्या अफेयरच्या चर्चा


एक काळ असा होता की, पूजा बेदी बॉलिवूड स्टार होती. तिच्यावर चाहते कायम फिदा असायचे, तिने अगदी कमी वेळातच आपला एक चाहता वर्ग तयार केला होता. आता तिची मुलगी अलाया फर्नीचरवाला सिनेजगतात दाखल झाली आहे. तेव्हापाससुन ते आत्तापर्यंत किती काळ बदलला आहे, अलीकडे पूजा यावर यावर उघडपणे बोलली आहे.

आपली मुलगी अलाया आणि ऐश्वर्य ठाकरे यांच्या डेटिंग अफवांवर पूजा म्हणाली की, कलाकाराला जरूरी नाही की, प्रसिद्धी मिळवण्याकरता असं काही करायची गरज आहे.

पूजाने अलायाशी संबंधित अफवांची पुष्टी दिली नाही किंवा नाकारले नाही. ती एका मुलाखतीत म्हणाली, ‘अलायाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, नेहमीच एक अंदाज लावला जाईल. माझ्या काळात गोष्टी वेगळ्या होत्या. त्यावेळी प्रियकरमुक्त असणे, कुमारी असणे (वर्जिन), आणि अविवाहित असणे आवश्यक होते. आज प्रत्येक व्यक्तीचा त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर अधिकार आहे.’

पूजा पुढे म्हणाली, ‘करीना कपूर खान लग्नानंतर चांगली कामगिरी करत आहे. मी म्हणेन की,इंडस्ट्रीत मोठा बदल झाला आहे, आणि प्रेक्षकांची मानसिकता बदलल्यामुळे असे घडले आहे. याबद्दल सोशल मीडियाचे आभार.’

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे, आणि अलाया यांच्या नात्याची अनेक दिवसांपासून चर्चा होत आहे. वर्षाच्या सुरूवातीला दिलेल्या मुलाखतीत अलाया म्हणाली होती, ‘तो माझा चांगला मित्र आहे. मला ठाऊक आहे की, हे सांगून लोक विश्वास ठेवणार नाहीत, पण आम्ही चांगले कौटुंबिक मित्र आहोत.’

अलायाच्या म्हणण्यानुसार, ‘आमच्या दोघांची आई एकमेकांना ओळखते, माझ्या आजोबांची त्याच्या आईशी ओळख आहे, म्हणून आम्ही बर्‍याच दिवसांपासून एकमेकांच्या जवळ आहोत. माध्यमांमध्ये आमचे सोबत फोटो येतात, आणि काहीतरी आहे, असा अंदाज वर्तविला जातो. ‘

अलायाच्या म्हणण्यानुसार, ‘आम्ही बर्‍याच काळापासून एकत्र अभिनय क्लास  केले आहेत आणि नृत्य क्लासला पण एकत्र जायचो. यापूर्वी माध्यमांनी आमचे फोटो क्लिक केले असते, तर त्यांच्याकडे अधिक फोटो असते. हेच कारण आम्ही एकत्र दिसतो.ऐश्वर्य बराच मजेदार आहे.’

अलायाने  नुकतेच बॉलिवूडमध्ये जवानी जानेमन या चित्रपटाद्वारे पदार्पण केले आहे. या चित्रपटातील आलायाच्या भूमिकेची चांगलीच चर्चा झाली होती. या चित्रपटात तिने सैफ अली खानच्या मुलीची भूमिका साकारली होती.


Leave A Reply

Your email address will not be published.