Friday, December 8, 2023

‘मोहनजोदाड़ो’ चित्रपटासाठी पहिली पसंती नव्हती पूजा हेगडे, रोल मिळण्यामागे होतं ‘हे’ मुख्य कारण

दक्षिण चित्रपटांची सुपरहिट अभिनेत्री पूजा हेगडे (१३ ऑक्टोबर) आपला ३१ वा वाढदिवस साजरा करत आहे. पूजा हेगडेची खूप मोठी फॅन फॉलोविंग आहे आणि ती नेहमीच चित्रपटांमध्ये सक्रिय असते. पूजा मॉडेलिंगमधून चित्रपटांमध्ये आली आहे. महाविद्यालयीन दिवसांपासून तिला अभिनयाची आवड होती आणि हा छंद तिला चित्रपटांकडे घेऊन आला. तिने आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला विविध प्रकारची कामे केली आहेत. आज आपण तिच्या वाढदिवशी तिच्या एका चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या चित्रपटासाठी ती पहिली पसंती नव्हती.

पूजा हेगडेचा जन्म १३ ऑक्टोबर १९९० रोजी मुंबईमध्ये झाला. ती आज एक सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने आपल्या चित्रपट कारकिर्दीमध्ये अनेक तेलुगु आणि हिंदी चित्रपट केले आहेत. पूजा हेगडे मिस युनिव्हर्स इंडिया २०१० ची सेकंड रनर-अप राहिली आहे.

पूजाने २०१२ मध्ये दक्षिण चित्रपटांमधून अभिनयात पदार्पण केले. तिचा पहिला चित्रपट ‘मुगामुडी’ होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला. २०१२ नंतर तिने दक्षिण इंडस्ट्रीमध्ये स्वत:चा ठसा उमटवला. अशा प्रकारे ती दक्षिण इंडस्ट्रीची सुप्रसिद्ध अभिनेत्री बनली.

पूजा हेगडेने २०१६ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आशुतोष गवारेकर यांच्या ‘मोहनजोदाड़ो’ चित्रपटात ती ऋतिक रोशनसोबत होती. मात्र, पूजा या चित्रपटासाठी ना ऋतिक रोशनला आवडली आणि ना चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गवारेकर यांचीही ती पहिली पसंती नव्हती. खरं तर, पूजा आशुतोष गवारेकर यांच्या पत्नीला आवडली होती. आशुतोष गवारेकर यांच्या पत्नीने पूजाला रणबीर कपूरसोबत एका जाहिरातीत पाहिले. त्यानंतर तिने तिच्या पतीला आगामी चित्रपटात पूजाला कास्ट करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर आशुतोषने तिला ‘मोहनजोदाड़ो’मध्ये कास्ट केले होते.

साल २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला ‘मोहनजोदाड़ो’ हा चित्रपट आशुतोष गोवारीकरच्या सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक होता. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही चांगली कामगिरी करू शकला नाही. पण खऱ्या अर्थाने हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर वाईट रीतीने मारला गेला. तब्बल ३ वर्षांनंतर पूजाने साजिद नाडियाडवालाच्या ‘हाऊसफुल ४’ या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये दमदार पुनरागमन केले.

सर्वाधिक कमाई करणाऱ्या तामिळ चित्रपटाची नायिका
तमिळ ऍक्शन ड्रामा चित्रपट ‘अला वेंकुंठप्रेमुलु’ ने २०२० मध्ये २५० कोटींची कमाई करून टॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचे शीर्षक पटकावले आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर पूजाचा आगामी चित्रपट सुपरस्टार प्रभाससोबत ‘राधे श्याम’ प्रदर्शित होईल. चित्रपटाचा फर्स्ट लूकही प्रदर्शित करण्यात आला असून, पूजाचा लूक प्रेक्षकांना आवडला आहे. ज्याचे दिग्दर्शन बोम्मरिल्लू भास्कर करत आहे. यासोबतच ती सलमान खानसोबत तिच्या आगामी ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटातही दिसणार आहे, ज्याचे दिग्दर्शन फरहाद सामजी करत आहेत. याशिवाय, ती अक्षय कुमारसोबत हाऊसफुल ४ मध्येही दिसली आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

नादच खुळा! अमिताभ बच्चन यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहणाऱ्या बॉडीगार्डला मिळतो ‘इतका’ पगार; आकडा तर वाचा…

अमिताभ नव्हे, तर ‘या’ नावाने आई मारायची हाक; रेखा यांना सोडण्यामागे होते ‘हे’ मोठ्ठे कारण

सलमान खानने बहीण अर्पिताला लग्नात दिलं होतं ‘हे’ महागडं गिफ्ट, किंमत ऐकून तर फिरतील तुमचे डोळे

हे देखील वाचा