सध्या मराठी टेलिव्हिजनवरील ‘बस बाई बसट हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत आला आहे. या कार्यक्रमात अनेक सेलिब्रेटी कलाकार सहभागी होत असतात. कार्यक्रमाचा होस्ट मराठी अभिनेता सुबोध भावे या सहभागी कलाकारांशी चांगलीच धमाल करताना दिसत असतो. काही दिवसांपूर्वीच या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली होती. आता लवकरच कार्यक्रमात अभिनेत्री पुजा सावंत दिसणार आहे.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, पुजा सावंत (Pooja Sawant) ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि सोज्वळ सौंंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पुजा तिच्या अभिनयाईतकीच सोशल मीडियावरही नेहमीच प्रसिद्ध असते. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ती नेहमीच तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसत असते. लवकरच ती बस बाई बस या कार्यक्रमात दिसणार आहे, ज्याचा प्रोमो तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केला आहे.
View this post on Instagram
या कार्यक्रमात सहभागी स्पर्धकांशी सुबोध भावे नेहमीच गप्पा मारताना, धमाल करताना दिसत असतो. यावेळी त्याने पुजा सावंतला एक टास्क देण्यात आला होता. ज्यामध्ये त्याने सिद्धार्थ मल्होत्राशी गप्पा मारण्यास सांगितले होते. यावेळी बोलताना पुजा सावंतने सांगितले की सिद्धार्थ मल्होत्रा त्याचा क्रश आहे. त्याच्याशी लग्न झालं तर खुप चांगल होईल. पुजाने असे म्हणताच कार्यक्रमात चांगलाच जल्ल्लोश पाहायला मिळतो. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
दरम्यान, अभिनेत्री पुजा सावंत सध्या तिच्या ‘दगडीचाळ २’ चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. या बहुचर्चित चित्रपटाची प्रेक्षकांना जोरदार उत्सुकता लागली आहे.
हेही वाचा – बापरे! स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांनाच दिली हॉटेलमध्ये नोकरी करण्याची ऑफर, बिग बींचे उत्तर ऐकून व्हाल थक्क
‘या’ कारणामुळे सना खानने सोडले बॉलिवूड, इंडस्ट्रीबाबत केला धक्कादायक खुलासाॉ
‘कंगनासोबात काम करणे म्हणजे…’ इमर्जन्सीमध्ये काम केल्यांनतर महिमा चौधरीने केला अनुभव शेअर