Monday, July 1, 2024

कौतुकास्पद! मराठमोळ्या पूजा सावंतने ‘हे’ महत्त्वाचं अभियान घेतलं हाती, फोटो आले समोर

आपल्या आयुष्यात सर्व जबाबदाऱ्यांप्रमाणे निसर्गाची सेवा करणे ही देखील एक मोठी जबाबदारी आहे. अशात सिनेसृष्टीतील अनेक कलाकार आपली भूमिका आणि जबाबदारी लक्षात घेत निसर्गाच्या संवर्धनासाठी सर्वतोपरी कार्य करत असतात. झाडे लावा झाडे जगवा ही मोहीम आपण लहानपणापासून ऐकत आहोत. पण हे फक्त ऐकण्यापुरते मर्यादित न ठेवता कृतीत देखील आणले पाहिजे. अशात मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत देखील निसर्गाचे संरक्षण करताना दिसली आहे.

पूजाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. सध्या पूजा कोकणात आहे आणि ती झाडे लावत आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये ती झाडाच्या पानांना किस करताना दिसत आहे. तिने हे फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “दरवर्षीप्रमाणे यंदाही मी माझ्या घरी एक झाड लावले आहे.” तिने लावलेल्या झाडाला उद्देशून ती पुढे म्हणते की, “कुटुंबात तुझं स्वागत आहे.”

अभिनेत्रीने यासह एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या मध्ये ती झाडासाठी स्वतः खड्डा खोदताना दिसत आहे. हातात फावडे घेऊन तिने हा खड्डा खोदला आहे आणि त्यामध्ये झाड लावले आहे. नंतर ती झाडाला पाणी घालताना देखील दिसत आहे. या रील व्हिडिओमध्ये ‘तिच्या घोवाला कोकण दाखवा’ हे गाणं ऐकू येत आहे. निसर्गाच्या सुरक्षिततेसाठी तिने केलेले हे काम कौतुकास्पद आहे. त्यामुळे कमेंटमध्ये तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पूजाच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाल्यास साल २०१० मध्ये तिने ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटामधून सिनेसृष्टीत पदार्पण केले. ‘निळकंठ मास्तर’ या चित्रपटातील इंदूची भूमिका तिने चांगलीच गाजवली होती. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. लवकरच ती स्वप्नील जोशीसह ‘बळी’ या चित्रपटात झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हिना खानचा ब्रेकअप? अभिनेत्रीच्या लेटेस्ट पोस्टमुळे चाहते पडले चिंतेत

-आर्यन खानला सकाळी ७ वाजता मिळणार जेलमधील जेवण, ‘या’ गोष्टीसाठी तरसणार शाहरुखचा मुलगा

-‘हे नक्की शाल्विताच का?’ ओम अन् स्वीटूच्या ‘त्या’ व्हिडिओवर रंगल्यात चाहत्यांच्या चर्चा

हे देखील वाचा