Saturday, July 6, 2024

‘हा‌ फोटो माझ्यासाठी खूप खास आहे, कारण…’, पूजा सावंतने कुटुंबासोबतचे फोटो केले शेअर

मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत चित्रपटांव्यतिरिक्त सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळेही चर्चेत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती सतत तिचे फोटो, व्हिडिओ पोस्ट करून नेटकऱ्यांचे मनोरंजन करत असते. आपले ग्लॅमरस फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधण्याची एकही संधी ती चुकवत नाही. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, प्राणी-पक्ष्यांवर पूजाचे खूप प्रेम आहे. अशातच तिच्या काही फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा चालू आहे. त्या फोटोंमध्ये ती तिच्या कुटुंबासोबत दिसत आहे.

पूजाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तीन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये ती एकटीच दिसत आहे. पूजा या फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिने लाल रंगाचा स्कर्ट आणि काळ्या रंगाचा टॉप घातलेला आहे. यासोबत तिने काळ्या रंगाची ओढणी घेतली आहे. नंतरच्या फोटोमध्ये ती तिच्या कुटुंबासोबत दिसत आहे. या फोटोमध्ये ती तिची आई, बहीण, वडील आणि भाऊ दिसत आहेत. तिच्या कुटुंबासोबत ती खूपच खुश दिसत आहे. खरं तर पूजाच्या वडिलांचा वाढदिवस असल्याने ते सगळे हॉटेलमध्ये गेले होते.

हे फोटो शेअर करून पूजाने कॅप्शन दिले आहे की, “माझे अनेक फोटो प्रोफेशनल फोटोग्राफरने काढलेले आहेत, पण हा फोटो खूप खास आहे. हा फोटो माझ्या बाबांनी काढला आहे. मला पुन्हा बालपणात गेल्यासारखे वाटत आहे. त्यामुळे मी हा फोटो पोस्ट केला आहे. कारण आज बाबांचा वाढदिवस होता.”

तिच्या कुटुंबासोबतचे हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. तसेच अनेकांना पूजाचा हा लूक देखील खूप आवडला आहे. अनेकजण तिच्या फोटोवर कमेंट करत आहेत.

पूजा सावंतच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून २०१० मध्ये चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. या चित्रपटात तिने भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील, सोनाली कुलकर्णी या कलाकारांसोबत काम केले होते. त्यानंतर तिने ‘दगडी चाळ’, ‘लपाछपी’, ‘झकास’, ‘नीलकंठ मास्टर’, ‘चिटर’, ‘वृंदावन’, ‘पोस्टर बॉईज’ या चित्रपटात काम केले आहे. पूजा सावंत तिच्या डान्समुळे देखील खूप लोकप्रिय आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ताहिराला येतेय पती आयुष्मानची आठवण; म्हणाली, ‘मला सर्वांसमोर प्रेम दाखवण्याचा शौक नाही, पण आम्ही…’

-‘नसीब अपना अपना’मध्ये राधिकांनी साकारली ऋषींच्या पत्नीची भूमिका; कोट्यवधींच्या कर्जामुळे सोसावी लागली…

-ऋषी अन् नीतू यांच्या लग्नात सिंदूर लावून पोहोचल्या होत्या रेखा; बिग बींसोबत लग्न…

हे देखील वाचा