Wednesday, April 23, 2025
Home मराठी पूजा सावंतच्या मनमोहक लूकने चुकवला चाहत्यांच्या काळजाचा ठोका, एक नजर टाकाच

पूजा सावंतच्या मनमोहक लूकने चुकवला चाहत्यांच्या काळजाचा ठोका, एक नजर टाकाच

मराठी सिनेसृष्टीतील मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत तिच्या लुक्सने नेहमी सोशल मीडियावरील युजर्सचे लक्ष वेधून घेत असते. तिच्या ग्लॅमरस लूकचे लाखो चाहते आहेत. सुंदर चेहरा आणि आकर्षक फिगर असणाऱ्या पूजाची फॅन फॉलोविंगही तगडी आहे. सतत आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.

अलीकडेच पूजा सावंतने एक फोटोशूट केलंय. यात अभिनेत्री साडीमध्ये दिसत आहे. तिने पिवळ्या रंगाची एम्ब्रॉयडरी साडी आणि त्यावर केशरी रंगाचं ब्लाउज घातलं आहे. तसेच, तिने हलका मेकअप करून केस मोकळे सोडले आहेत. ज्यामुळे तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. घातलेल्या मोजक्या दागिन्यांनी अभिनेत्रीच्या सुंदरतेला चार चांद लावले आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. (pooja sawant shared her saree look with fans)

या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला. फोटोतील तिचा लूक आणि ग्लॅमरस अंदाज पाहून तिचे चाहते खूपच प्रभावित झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे चाहत्यांनी तिच्या पोस्टवर अक्षरशः लाईक्सचा पाऊस पाडला. चाहत्यांनी कमेंटबॉक्स मध्ये हार्टचे ईमोजी पोस्ट करून आपले प्रेम व्यक्त केले आहे. या फोटोला ५६ हजाराहुन अधिक लाईक्स मिळाले आहेत.

अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तिने २०१० मध्ये आलेल्या ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. तेव्हापासून तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. २०१५ साली आलेल्या ‘दगडी चाळ’ चित्रपटातील तिची भूमिका खूपच गाजली.

यांनातर २०१८ साली ‘लपाछपी’ या चित्रपटातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल पूजा सावंतला ‘दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे तिला हिंदी चित्रपटांचीही ऑफर आली. २०१९मध्ये आलेल्या ‘जंगली’ या चित्रपटात ती विद्युत जामवालसोबत दिसली होती. यात तिने नायिकेची भूमिका साकारली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सर्वांना पोट धरून हसवणाऱ्या कपिलने एकेकाळी केलंय टेलिफोन बुथवर काम, वाचा त्याच्या संघर्षाची कहाणी

-‘तिचं नाव सुद्धा आठवत नाहीये…’, रणवीर सिंगच्या गर्लफ्रेंडबद्दलच्या ‘या’ प्रश्नावर सलमान खानचं तडकीफड उत्तर

-यामी गौतमचा मोठा खुलासा, किशोरवयीन काळापासून ‘या’ आजाराने आहे अभिनेत्री ग्रस्त

हे देखील वाचा