Monday, July 1, 2024

…आणि शशी कपूर यांनी पूनम ढिल्लोच्या खाडकन वाजवली कानाखाली, उपस्थित लोकं फक्त पाहतच राहिले

बॉलिवूडमधील सगळ्यात सुंदर अभिनेत्रींपैकी एक अशी गनना झालेली केलेली अभिनेत्री म्हणजे पूनम ढिल्लो. जर तुम्हाला असे सांगितले की, दिग्गज अभिनेते शशी कपूर यांनी पूनमला कोणताही विचार न करता खाडकन कानाखाली वाजवली होती, तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे घडलं होतं एका सिनेमाच्या सेटवर. शशी कपूर यांची आज शनिवारी (दि. 18 मार्च) रोजी जयंती आहे. या निमित्ताने जाणून घेऊया हा किस्सा…

पूनम ढिल्लोचा जन्म 18 एप्रिल, 1962 मध्ये कानपूर येथे झाला होता. तिचे वडील इंजिनियर होते. पुनमचा जन्म जरी कानपूरमध्ये झाला असला, तरीही तिचे संपूर्ण शिक्षण पंजाबमध्ये झाले. अत्यंत सुंदर असणाऱ्या पुनमला वयाच्या सोळाव्या वर्षी यंग ‘मिस इंडिया’ हा पुरस्कार मिळाला. बॉलिवूडमधील दिग्गज दिग्दर्शक आणि निर्माता यश चोप्रा यांना ती एवढी आवडली होती की, त्यांनी तिला त्यांच्या त्रिशूल या चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली. परंतु त्या वेळी पुनमला डॉक्टर बनायचे होते, त्यामुळे तिने ती संधी नाकारली. 

परंतु नंतर त्यांनी पूनमला समजावले आणि पूनम चित्रपटात काम करायला तयार झाली. पहिल्या चित्रपटात तिने संजीव कपूर, शशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केले. तिचा ‘त्रिशूल’ हा चित्रपट खूपच गाजला.

शशी कपूर यांनी वाजवली कानाखाली
या चित्रपटातील एका सिनमुळे ती खूपच चर्चेत होती. या सीनमध्ये अभिनेता शशी कपूर यांना तिच्या कानाखाली मारायची होती. या सीनची सुरुवात झाली तेव्हा यश चोप्रा यांनी ॲक्शन बोलता क्षणीच शशी कपूर यांनी खाडकन कानाखाली मारली. आधी कोणताही विचार न करता त्यांनी कानाखाली मारली, कारण त्यांना असे वाटत होते की, हा सीन खूपच वास्तववादी वाटावा. परंतु पूनमला या गोष्टीची कल्पना नसल्यामुळे ती खूपच हैराण झाली आणि त्यांच्याकडे बघू लागली. नंतर जेव्हा शशी कपूर यांना त्यांची चूक समजली त्यावेळी त्यांनी स्वतः जाऊन पूनमची माफी मागितली.

यानंतर यश चोप्रा यांनी त्यांच्या ‘नुरी’ या चित्रपटात तिला मुख्य भूमिकेचे पात्र दिले. हा चित्रपट खूपच लोकप्रिय झाला. प्रेक्षकांकडून देखील या चित्रपटाला खूप प्रेम मिळाले. या चित्रपटासाठी पूनमला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिक मिळाले.

पूनमने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामध्ये दर्द, निशाणा, जमाना, तेरी मेहरबानिया, समुंदर सवेरे वाली गाडी, कर्मा, नाम ,मालामाल यांसारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे. अनेक मोठ्या चित्रपटांचा भाग असलेली पूनम ही छोट्या पडद्यावरील बिग बॉस 3 मध्ये देखील स्पर्धकाच्या रुपात दिसली होती.

दुसरीकडे, शशी कपूर यांच्या सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी ‘आप बीती’, ‘अजूबा’, ‘अनारी’, ‘आ गले लग जा’, ‘दीवार’, ‘काला पत्थर’, ‘शान’, ‘चोर मचाये शोर’ यांसारख्या सिनेमात काम केले आहे.(poonam dhillon and shashi kapoor slapped scene lets know here)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
कॉमेडियनच नाही, तर डान्सर म्हणूनही कमवलंय बरंच नाव, जावेद जाफरींबद्दल खास गोष्टी एकाच क्लिकवर
जेव्हा शशी कपूर यांनी मुमताजसोबत चित्रपट करण्यास नकार दिला होता, तेव्हा घडले ‘असे’ काही

हे देखील वाचा