वैवाहिक जीवनातील भांडणांमुळे अभिनेत्री पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेत्रीमुळे तिचा पती सॅम बॉम्बेला अटक केली गेली आहे. पूनम पांडेने पती सॅमवर मारहाणीचा आरोप केला आहे. अशा परिस्थितीत मुंबई पोलिसांनी ८ नोव्हेंबर रोजी, सॅमला अटक केली असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे.
पूनम पांडेच्या तक्रारीनुसार, पती सॅमसोबत त्याची पहिली पत्नी अलविरावरून तिचा वाद झाला होता. यादरम्यान सॅम संतापला आणि त्याने पूनमला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीमध्ये पूनमच्या चेहऱ्याला दुखापत झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम रुग्णालयात दाखल आहे. त्याचवेळी आता वांद्रे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (poonam pandey alleges assault against husband sam bombay arrested by bombay police)
लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर, पूनम पांडेने तिचा प्रियकर सॅम बॉम्बेसोबत गुपचूप लग्न केले होते. गेल्या वर्षी १० डिसेंबरला दोघांनी लग्नगाठ बांधली होती. यानंतर दोघेही गोव्याला गेले, पण इथे पूनम आणि सॅममध्ये खूप भांडणे झाली. अभिनेत्री पूनम पांडेने गोव्यातही तिच्या पतीविरोधात एफआयआर दाखल केला होता. लग्नानंतर अवघ्या १२ दिवसांतच दोघांमध्ये मतभेद झाल्याच्या बातम्या येऊ लागल्याने, सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.
त्यावेळी पूनम पांडेने पती सॅम बॉम्बेवर विनयभंग, धमक्या आणि मारहाणीचे आरोप केले होते. यावेळी पोलिसांनी सॅमला अटकही केली होती. मात्र काही वेळाने त्याला जामीन मिळाला.
पूनम २०११ मध्ये देखील खूप चर्चेत आली होती. जेव्हा ती म्हणाली होती की, “जर भारतीय क्रिकेट संघाने वर्ल्डकप जिंकला, तर मी न्यूड होईल.” एवढंच नाही तर माध्यमांतील वृत्तानुसार, पूनम पांडेने या संदर्भात बीसीसीआयला एक पत्र देखील लिहिले होते.
पूनमने ‘नशा’, ‘आ गया हीरो’, ‘द जर्नी ऑफ कर्मा’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-