Tuesday, July 9, 2024

पूनम पांडेचा ‘मनिके मागे हिते’ गाण्यावरील व्हिडिओ तुफान व्हायरल, मॉडेलसोबत दिसला तिचा पती

मॉडेल पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पूनमने पती सॅम बॉम्बेविरुद्ध मुंबई पोलिसांत मारहाणीची तक्रार दाखल केली होती. तक्रार मिळाल्यानंतर वांद्रे पोलिसांनी त्याला अटक केली. पूनमला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिला रूग्णालयात का दाखल करण्यात आले, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. मात्र, याचदरम्यान तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पूनम पांडे श्रीलंकन ​​हिट गाणे ‘मनिके मागे हिते’वर तिचा स्वॅग दाखवत आहे.

पती सॅम बॉम्बेला तुरुंगात पाठवल्यानंतर तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ काही आठवड्यापूर्वीचा आहे. पूनमच्या या रीलला आतापर्यंत ७ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओ पाहून असे दिसते की, या रीलमध्ये तिच्यासोबत पती सॅम बॉम्बे देखील उपस्थित आहे. खुद्द पूनम पांडेनेही रीलवर प्रतिक्रिया देताना लिहिले आहे, “त्याचा मोठा हात.”

पूनम गायक योहानीच्या ‘मनिके मागे हिते’ या गाण्यावर डोलताना दिसत आहे. हा व्हिडिओ तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. चाहते या व्हिडिओवर प्रतिक्रिया देऊ शकत नाहीत, कारण पूनम पांडेने व्हिडिओचा कमेंट सेक्शन बंद केला आहे. व्हिडिओमध्ये पूनमने काळ्या रंगाचा स्वेटशर्ट घातलेला दिसत आहे. तिच्या चेहऱ्याचे भाव चाहत्यांना खूप आवडले.

पूनम पांडने आपल्या पतीविरोधात यापूर्वीच तक्रार दाखल केली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येही पूनम पांडेने तिच्या पतीविरुद्ध गोव्यात गुन्हा दाखल केला होता. गेल्या वर्षी १० सप्टेंबर रोजी दोघांचे लग्न झाले होते. लग्नाच्या १२ दिवसानंतरच दोघांमध्ये भांडण झाल्याची बातमी समोर आली. लग्नाआधी दोघांनी जवळपास २ वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये घालवली. गेल्या वर्षी पूनम पांडेने पती सॅमवर विनयभंग, धमकी आणि मारहाणीचे आरोप केले होते. पूनम पांडेच्या तक्रारीनंतर गोवा पोलिसांनी सॅमला अटक केली होती. मात्र, नंतर त्याची जामीनावर सुटका झाली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा