Monday, June 24, 2024

संपूर्ण जगाला आपल्या आवाजाने वेड लावणाऱ्या प्रसिद्ध गायिकेचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन

साठ आणि सत्तरच्या दशकातील लोकप्रिय गायिका आणि स्टेज परफॉर्मर टीना टर्नर यांचे दुःखद निधन झाले आहे. टीना टर्नर यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. त्या मागील बऱ्याच काळापासून आजारी होत्या. २३ मे रोजी अखेर त्यांचे निधन झाले. टीना यांच्या निधनाची माहिती त्यांची मॅनेजरने दिली. टीना टर्नरला ‘रॉक एंड रोल’ची क्वीन म्हटले जाते.

टीना टर्नर यांचे संगीत क्षेत्रात मोठे नाव होते. त्यांनी त्यांच्या हिंमतीवर संगीत क्षेत्रात आपले नाव उंचावले. टीना टर्नर यांचे लहानपणीचे नाव अन्ना मे बुलक होते. साधारण ५० च्या दशकात त्यांनी त्यांच्या संगीताच्या करियरची सुरुवात केली. टीना टर्नर यांना यश तेव्हा मिळाले जेव्हा १९६० च्या दशकात ‘ए फूल इन लव’ हे गाणे जबरदस्त हिट झाले. यानंतर त्यांनी अनेक म्युझिक अल्बम केले जे तुफान गाजले.

टीना टर्नर यांचे ८० च्या दशकात असे असंख्य गाणे होते जे टॉप ४० मध्ये सामील झाले होते. टीना यांचा १९८८ साली एक शो होता ज्यात तब्बल १ लाख ८० हजार लोकं आले होते. या कॉन्सर्टला आज देखील जगातील सर्वात मोठा कॉन्सर्ट समजला जातो. कारण कोणत्याही एका गायकासाठी कधीच एखाद्या कॉन्सर्टमधे एवढी गर्दी झाली नव्हती.

Tina Turner

टीना टर्नर केवळ गायिकाच नाही तर उत्तम अभिनेत्रीही होत्या. त्यांनी काही चित्रपटांमध्ये भूमिका देखील साकारल्या होत्या. २००४ मध्ये टीना टर्नर मर्चंट आयव्हरी चित्रपटात काम करणार होत्या. या चित्रपटाचे नाव होते ‘द गॉडेस’. या चित्रपटात टीना टर्नर यांना माँ कालीची भूमिका मिळाली होती. मात्र एका वृत्तानुसार, टीना टर्नर माँ कालीच्या भूमिकेच्या तयारीसाठी भारतात आल्या होत्या. भारतात त्यांनी काही मंदिरांना भेटही दिली होती.

टीना टर्नर यांनी त्याच्या व्यावसायिक आयुष्यात अफाट यश पाहिले. मात्र वैयक्तिक आयुष्यात त्यांनी तेवढेच दुःख सहन केले. टीना टर्नरचे पहिले लग्न इके टर्नरशी झाले होते. मात्र त्यांचे हे लग्न फार काळ टिकले नाही आणि घटस्फोट झाला. त्यानंतर टीना यांनी १९८६ मध्ये त्यांचे आत्मचरित्र लिहिले आणि त्यात त्यांनी लग्नाबाबत मोठा खुलासा केला. टीना टर्नर यांनी सांगितले होते की त्यांचे पहिले पती इके टर्नर यांनी त्यांच्यावर खूप अत्याचार केले. एकदा नवऱ्याने त्यांच्या चेहऱ्यावर गरम कॉफी फेकली होती. यात टीना टर्नर गंभीर भाजल्या होत्या. एकदा त्यांच्या पतीने त्यांच्या नाकावर इतका जोरात बुक्का मारला होता, त्याचा परिणाम कायम राहिला. टीना टर्नर जेव्हा गाणे गायच्या तेव्हा त्यांच्या तोंडातून रक्त यायचे.

पुढे नंतर टीना टर्नर यांनी २०१३ मध्ये एर्विन बाखशी लग्न केले होते. टीना टर्नर या चार मुलांच्या आई होत्या. त्यांच्या निधनामुळे संपून जगातील त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.

हे देखील वाचा