टेलिव्हिजनचे लोकप्रिय जोडपे आमिर अली (Aamir Ali) आणि संजीदा शेख (Sanjeeda Shaikh) हे अनेक दिवसांपासून वेगळे राहत होते. मात्र आता दोघांचाही घटस्फोट झाला आहे. दोघांचे ९ वर्षांचे नाते संपुष्टात आले आहे. या दोघांनाही एक मुलगी आहे, जी आतापर्यंत दोघांसोबत राहायची. कधी अभिनेत्री आपल्या मुलीसोबतचा फोटो शेअर करते तर कधी अली. पण आता येत असलेल्या बातम्यांनुसार संजीदाला मुलीची कस्टडी मिळाली आहे.
दोघेही एकमेकांपासून वेगळे झाल्यानंतर आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. दोघेही खूप खाजगी लोक आहेत. त्यामुळे या विषयावर कधीच बोलले नाही आणि पुढेही ते त्यांचा घटस्फोट जाहीर करणार नाही.
अनेक वर्षे एकत्र राहिल्यानंतर आमिर आणि संजीदाने २०१२ मध्ये लग्न केले होते. या दोघांची जोडी खूप पसंत केली गेली होती. अनेकवेळा दोघेही काही शोमध्ये एकत्र दिसले होते. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांच्या पोस्ट शेअर करत असत. पण त्यानंतर २०२० पासून दोघांच्या लग्नात मतभेदाच्या बातम्या येऊ लागल्या. दोघे वेगळे राहत असल्याचे बोलले जात होते आणि नंतर याची पुष्टीही झाली. अलीला सोडून संजीदा तिच्या आईवडिलांच्या घरी राहते.
तसे, जेव्हा त्यांच्या विभक्त झाल्याची बातमी आली तेव्हा त्यांच्या मुलीचीही माहिती समोर आली. या दोघांना सरोगसीच्या माध्यमातून मुलगी झाल्याची माहिती समोर आली आहे. दोघेही आपल्या मुलीसोबतचे फोटो शेअर करत असतात. कधी मुलगी आमिरसोबत राहते तर कधी संजीदासोबत राहते. मात्र, आतापर्यंत दोघांपैकी कोणीही त्यांच्या विभक्त होण्याबाबत काहीही बोललेले नाही.
आता हे दोघे घटस्फोटावर खुलेपणाने बोलतील का ते पाहूया. तसे, आमिरपासून वेगळे झाल्यानंतर संजीदा तिचे पूर्ण लक्ष तिच्या मुलीवर आणि व्यावसायिक जीवनावर केंद्रित करत आहे. गेल्यावर्षी ती ‘तैश’ आणि ‘काली कुही’ या दोन चित्रपटांमध्ये दिसली होती. आता ती ‘कुन फया कुन’ आणि ‘मैं ते बापू’मध्ये दिसणार आहे.
हेही वाचा :