Sunday, June 8, 2025
Home हॉलीवूड ‘फ्रेंड्स: द रियुनियन’च्या भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीझ

‘फ्रेंड्स: द रियुनियन’च्या भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीझ

जगभरात सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या आणि सर्वाधिक प्रशंसा मिळालेल्या मालिकांमध्ये ‘फ्रेंड्स’ सर्वात पुढे आहे. नव्वदच्या दशकातील मुलांमध्ये ही मालिका चांगलीच लोकप्रिय आहे. आता जेव्हा या मालिकेतील कलाकार पुन्हा एकदा एका ठिकाणी एकत्र होत आहेत, तर अशामध्ये भारतीय तरुणांनाही या मालिकेने आपल्याकडे आकर्षित केले आहे. अशात तब्बल १७ वर्षांनंतर ‘फ्रेंड्स: द रियुनियन’ ही मालिका नव्याने चाहत्यांच्या भेटीला येत असल्यामुळे चाहते भलतेच उत्सुक झाले आहेत. आता भारतीय प्रेक्षकही ही मालिका पाहू शकणार आहेत. कारण ही मालिका भारतीय ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

‘फ्रेंड्स: द रियुनियन’ ही मालिका भारतीय ओटीटी प्लॅटफॉर्म झी५ वर प्रदर्शित केली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता भारतीय प्रेक्षकही या मालिकेचा (टॉक शो) आनंद लुटणार आहेत.

माध्यमांतील वृत्तांनुसार, ‘फ्रेंड्स: द रियुनियन’ ही स्क्रिप्ट नसलेली मालिका आहे. ज्यामध्ये या मालिकेतील कलाकार जेनिफर ऍनिस्टन, कर्टनी कॉक्स, डेविड स्क्वीमर, कर्टनी कॉक्स, लिझा कुरदोव, मॅथ्यू पेरी आणि मॅट लिब्लॅंक हे एकत्र येणार आहेत.

‘फ्रेंड्स: द रियुनियन’बद्दल बोलताना झी५ भारतचे मुख्य व्यवसाय अधिकारी मनीष कालरा म्हणतात की, “आम्हाला हे सांगताना खूप आनंद होत आहे की, ‘फ्रेंड्स: द रियुनियन’चे प्रसारण भारतात आम्ही झी५ वर करत आहोत. संपूर्ण जग या मालिकेबद्दल चर्चा करत आहे आणि भारतीय प्रेक्षकांसमोर हे सादर करणे ही आमच्यासाठी खूप मोठी संधी आहे. झी५चे ग्राहक या शोचा लॉकडाऊनदरम्यान आपल्या घरात खूप आनंद घेऊ शकतात.”

एचबीओ मॅक्सवर २७ मे रोजी या मालिकेचे प्रसारण होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मालिकेत डेविड बॅकहम, जस्टिन बीबर, बीटीएस, जेम्स कॉर्डेन, सिंडा क्रॉफर्ड, लेडी गागा, मिंडी कालिंग, रीस विदरस्पून आणि मलाला यूसुफजई यांचाही समावेश असणार आहे.

हे देखील वाचा