Sunday, September 8, 2024
Home टेलिव्हिजन धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या केसाला लागली आग अन…, व्हिडिओ झाला व्हायरल

धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या केसाला लागली आग अन…, व्हिडिओ झाला व्हायरल

अभिनेत्री छवी मित्तल ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय असते. ती अनेकदा चाहत्यांसोबत नवनवीन पोस्ट शेअर करत असते. पण यावेळी अभिनेत्रीने अशी माहिती शेअर केली आहे, जी जाणून घेतल्यानंतर तिच्या चाहत्यांना तिची काळजी वाटू लागली आहे. लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री छवी मित्तल हिच्यासोबत नुकतीच एक धक्कादायक घटना घडली. शूटिंग करत असताना तिच्या केसांना आग लागली. ही घटना एका व्हिडिओमध्ये कैद झाली आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, छवी (Chhavi Mittal) आपल्या पतीशी बोलत असताना तिच्या केसांना आग लागते. हे पाहून करणवीर ग्रोवर लगेच तिच्या मदतीला धावून येतो. त्याने हातात कपडे घेऊन तिच्या केसांना आग विझवली. अभिनेत्रीच्या केसांना आग लागली. तिचे केस थोडेसे नाही तर मोठ्या प्रमाणात जळाले होते.

या घटनेनंतर छवी म्हणाली, “सेटवर अपघात होत असतात आणि आताच एक अपघात होता होता वाचला. माझे केस जळाले. तुम्ही व्हिडीओ पाहिलाच असेल. हे भितीदायक होते. पण करण, माझे केस वाचवल्याबद्दल धन्यवाद. आधी आम्हा सर्वांना केस जळाल्याचा वास आहे. मग माझ्या पाठीमागे एक मेणबत्ती असल्याचं मला लक्षात आलं. मी थोडी पुढे सरकले, पण तोपर्यंत केसांना आग लागली होती.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Chhavi Mittal (@chhavihussein)

 दरम्यान, छवीला पाठदुखीचा त्रास आहे. तिला जवळपास 15-18वर्षांपासून तिला त्रास आहे. ती सेटवर थेरपी घेतानाही दिसली आहे. पाठदुखीमुळे तीन महिन्यांत तिचे वजन 8 किलोने वाढले आहे, असंही छवी म्हणाली. याशिवाय छवीला स्तनाचा कॅन्सर असून ती उपचार घेत आहे. या घटनेनंतर छवीच्या चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, छवीने या घटनेचा व्हिडिओ शेअर करत तिच्या चाहत्यांना आश्वासन दिले आहे की, ती ठीक आहे. (Popular television actress Chhavi Mittal hair caught on fire video goes viral)

आधिक वाचा-
‘दबंग खान’ सलमानचा भाऊ असूनही सोहेल खानला करावं लागलं होतं पळून जाऊन लग्न? वाचा कारण
धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या केसाला लाग आग अन…, व्हिडिओ झाला व्हायरल

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा