भारतीय मनोरंजनसृष्टीचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडे चित्रपट मालिकांमध्ये असलेले संगीत. संगीत हा भारतीय प्रेक्षकांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. घरी, दारी, चालताना, व्यायाम करताना, घरातले, ऑफिसचे काम करताना कानावर संगीत पडणे काही लोकांसाठी गरजेचेच असते.
शिवाय संगीतामुळे मनावरील मरगळ आणि ताण देखील दूर होण्यास मदत होते. आपल्याकडे चित्रपट, मालिका ही हिट होणार की फ्लॉप हे त्याच्या संगीतावरून ठरवले जाते. काही चित्रपट, मालिका फक्त त्यातील गाण्यांमुळेच पाहिल्या जातात. किंबहुना कधी- कधी रसिक चित्रपटगृहांमध्ये फक्त सिनेमातील गाणी ऐकण्यासाठीच जातात.
संगीताचा इतका मोठा प्रभाव आपल्या आयुष्यावर आहे.
चित्रपटांमध्ये गाणी असणे तर स्वाभाविकच आहे. मात्र, मालिकांमध्ये सुद्धा खास गाणी तयार करून वापरले जातात. शिवाय मालिकांचे टायटल ट्रॅक देखील खूपच आकर्षक असतात. काही मालिका संपून अनेक वर्ष झाली तरीही त्या मालिकांची गाणी प्रेक्षकांची रिंगटोन, कॉलर टोन आहेत. आजही ती गाणी तितक्याच उत्साहाने आणि आनंदने ऐकल्या जातात. महिला मंडळी या मालिकांचे गाणे ऐकताच आपलं हातातलं काम सोडून पाहण्यासाठी टीव्हीपुढे हजेरी लावत. पाहूया अशाच काही मालिकांची गाणी.
कसोटी जिंदगी की
एकता कपूरचा ‘कसोटी जिंदगी की’ ही मालिका तुफान हिट झाली. म्हणूनच एकताने पुन्हा या शो ला नव्या रूपात, नव्या ढंगात प्रेक्षकांसमोर आणले. प्रेरणा आणि अनुराग ही जोडी त्या काळात खूप लोकप्रिय झाली. जुन्या मालिकेतील प्रेरणा आणि अनुराग यांच्यात प्रेम दाखवण्यासाठी वापरले जाणारे गाणे खूप गाजले होते. हे गाणे बाबुल सुप्रियो आणि प्रिया भट्टाचार्यने गायले होते.
कहानी घर घर की
हा शो देखील एकता कपूरचा होता. मालिकेइतकेचे या शो चे टायटल ट्रॅक लोकांच्या पसंतीस उतरले. ओम आणि पार्वती यांनी प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली आणि मालिकेच्या संगीताने देखील प्रेक्षकांना वेड लावले होते. हे गाणे प्रिया भट्टाचार्यने गायले होते.
क्योंकि सास भी कभी बहू थी
ज्या मालिकेने टीव्ही क्षेत्रात अनेक वेगवेगळे विक्रम केले आणि प्रेक्षकांच्या मानत अढळ स्थान मिळवले त्याच मालिकेचे गाणे देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. सध्या केंद्रीय मंत्री असणाऱ्या स्म्रिती इराणी यांनी या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. हे गाणेही प्रिया भट्टाचार्यने गायले होते.
कुमकुम एक प्यारा सा बंधन
स्टार प्लसवरील दुपारी लागणारी ‘कुमकुम एक प्यारा सा बंधन’ ही मालिका देखील खूप लोकप्रिय झाली. या मालिकेचे गाणे देखील आजही तितक्याच आवडीने ऐकले जाते. हे गाणे पामेला जैन आणि सोनू निगमने गायले होते.
ये रिश्ता क्या कहलाता हैं
अक्षरा आणि नैतिक यांची या मालिकेतील जोडी रसिकांना खूपच भावली. या मालिकेच्या टायटल ट्रॅक सोबतच मालिकेतील कृष्णाचे गाणे, दिल से बंधी डोर इतर सर्वच गाणी हिट झाली. टायटल ट्रॅक अलका याग्निक, पामेला जैन, नवीन त्रिपाठी आणि जावेद अली यांनी गायले होते. दुसरीकडे कृष्णाचे ‘ओ कान्हा मुरली की मधुर सुना दो’ हे गाणे रुणझुणने गायले होते. यातील आणखी एक गाणे महिलांना खूप आवडते. त्याचे नाव आहे ‘दिल से बंधी एक डोर.’
सत्यमेव जयते
अमीर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या शो च्या टायटल ट्रॅकसोबतच प्रत्येक भागाच्या शेवटी दाखवले जाणारे गाणे देखील खूप हिट झाले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…