Friday, July 5, 2024

‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी प्रभास करणार ‘राधेश्याम’ चित्रपटाबाबत मोठी घोषणा, सोशल मीडियावर दिली माहिती

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार प्रभास आणि पूजा हेगडे यांचा आगामी चित्रपट ‘राधेश्याम’ हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु मार्च महिन्यात प्रेक्षकांची प्रतीक्षा संपणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरने इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अशातच या चित्रपटाचा नवीन पोस्टर समोर आला आहे. यात प्रभास आणि पूजा हेगडे जबरदस्त अंदाजात दिसत आहेत. हा पोस्टर शेअर करून प्रभासने त्याच्या चाहत्यांना सांगितले आहे की, या चित्रपटाबाबत एक मोठी घोषणा तो व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी करणार आहे.

प्रभासने(prabhas(  अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून या चित्रपटाचा पोस्टर शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये पूजा (pooja hegde) होळी खेळताना दिसत आहे. तिच्या हाताला गुलाल लागला आहे आणि तर दुसरीकडे प्रभास कोणत्यातरी गाढ विचारात दिसत आहे. त्यांच्या बॅकग्राउंडला सगळी फुले आहेत. (Prabhas released the new poster of the film radheshyam)

हा पोस्टर शेअर करून प्रभासने सांगितले आहे की, तो व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी म्हणजे १४ फेब्रुवारी रोजी या चित्रपटाबाबत खास माहिती देणार आहे. चार वेगवेगळ्या भाषांमध्ये हा पोस्टर शेअर करून त्याने लिहिले आहे की, “आमच्याकडे तुमच्यासाठी एका खास दिवशी काही खास माहिती आहे.” सोशल मीडियावर ‘राधेश्याम’ चित्रपटाचा नवीन पोस्टर सगळ्यांना खूप आवडतं आहे.

प्रभास आणि पूजाचा हा चित्रपट १४ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. परंतु कोरोनामुळे निर्मात्यांनी तारीख लांबवली. आता हा चित्रपट ११ मार्च २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तमिळ, तेलुगूसोबत, हिंदी, कन्नड, मल्याळम भाषेत देखील चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कृष्ण कुमार यांनी केले आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा