आपल्या भारतात चित्रपट हे संगीत, कथा, दिग्दर्शक यांच्या नावावर नाही तर चित्रपटात मुख्य कलाकार कोण आहेत, यावर चित्रपटगृहांमध्ये पाहिले जातात. कलाकार हा चित्रपटाचा आरसा असतो. त्यामुळे या कलाकारांवर चित्रपटाच्या निर्मात्यांना खूपच विश्वास असतो. कलाकार देखील त्याची लोकप्रियता बघत असतो, आणि त्यानुसार तो त्याचे मानधन त्याची फी ठरवतो. जेव्हा नवीन सिनेमा येतो तेव्हा त्यासोबतच त्यात काम करणाऱ्या कलाकाराच्या फीची तुफान चर्चा होते. कलाकारांचे ते घेत असलेली फीमध्ये देखील वेगवेगळे रेकॉर्ड आहेत.
‘तान्हाजी’ फेम ओम राऊत लवकरच त्याचा दुसरा भव्य असा ‘आदिपुरुष’ नावाचा सिनेमा घेऊन येत आहे. या चित्रपटात बाहुबली फेम प्रभास मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. तेलुगू सुपरस्टार असणाऱ्या प्रभासला ‘बाहुबली’ सिनेमाने संपूर्ण जगात ओळख मिळवून दिली. आता प्रभास त्याच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. या सिनेमासाठी प्रभासने बक्कळ फी घेतली असल्याची जोरदार चर्चा आहे. त्याच्या फीची रक्कम ऐकली तर नक्कीच तुमचे डोळे पांढरे होतील.
एका मोठ्या वेबपोर्टलनुसार प्रभासने त्याच्या आगामी ‘आदिपुरुष’ आणि ‘स्पिरिट’ या चित्रपटांसाठी तब्बल १५० कोटी रुपयांची मोठी रक्कम घेतली आहे. या बातमीनुसार विचार केला तर त्याने मागील १० वर्षांमध्ये सर्वात जास्त फी घेणाऱ्या सलमान खान आणि अक्षय कुमारला देखील मागे सोडले आहे. सलमान खानने ‘सुलतान’ आणि ‘टायगर जिंदा हैं’ साठी १०० कोटींपेक्षा अधिक रक्कम घेतल्याचे बोलले गेले. तर अक्षय कुमारने त्याच्या ‘बेल बॉटम’ सिनेमासाठी १०० कोटी रुपये घेतले होते. जर प्रभासने खरंच एवढी फी घेतली असेल तर हा नक्कीच एक मोठा रेकॉर्ड ठरणार आहे.
ओम राऊतचे दिग्दर्शन असलेल्या ‘आदिपुरुष’ या सिनेमात प्रभससोबतच सैफ अली खान, कृती सेनन, सनी सिंग हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. हा सिनेमा पौराणिक ‘रामायण’ या ग्रंथावर आधारित असणार आहे. यात प्रभास राम, सैफ अली खान रावण आणि कृती सीता आणि सनी लक्ष्मणच्या भूमिकेत दिसतील. ११ ऑगस्ट २०२२ मध्ये ‘आदिपुरुष’ प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. याशिवाय प्रभास लवकरच ‘राधे श्याम’ सिनेमात देखील दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-युविका चौधरीच्या अगोदर ‘या’ सुंदऱ्यांसोबत जोडलं गेलंय प्रिन्सचं नाव, नोरा फतेहीचाही आहे समावेश
-भररस्त्यात पती रोहनप्रीतसोबत रोमान्स करताना दिसली नेहा कक्कर, गायिकेचे ‘लिप-लॉक’ फोटो आले समोर
-‘या’ अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोरच उघडली शर्टची बटणं आणि पँटची झिप, व्हायरल होतंय बोल्ड फोटोशूट