Saturday, October 26, 2024
Home कॅलेंडर दिग्दर्शकाच्या ‘या’ मागणीवर प्राचीने केले स्वतःला व्हॅनिटीमध्ये बंद; वाचा तिच्याबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी

दिग्दर्शकाच्या ‘या’ मागणीवर प्राचीने केले स्वतःला व्हॅनिटीमध्ये बंद; वाचा तिच्याबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी

अभिनय क्षेत्रामध्ये अभिनेत्रींनी हॉट आणि बोल्ड असावे अशी अनेकांची मागणी असते. यामध्ये दिग्दर्शकांसह चाहत्यांचाही समावेश असतो. अशावेळी अनेक अभिनेत्री आपल्या अभिनयाच्या जोरावर भरपूर यश संपादन करतात. त्यानतर त्यांच्याकडे हॉट आणि बोल्ड सीनची मागणी केली जाते. या सर्वांना कंटाळून काही कलाकार बॉलिवूडला राम राम ठोकतात. यातीलच एक अभिनेत्री प्राची देसाई. (Prachi desai) प्राची मंगळवारी ( 12 सप्टेंबर) तिचा वाढदिवस साजरा करत आहे.

प्राची अगदी लहान वयामध्येच अभिनयात पारंगत झाली होती. तिचा जन्म गुजरातमधील सुरत येथे 12 सप्टेंबर 1989मध्ये झाला. तिने सुरतमध्ये तिचे इयत्ता 9वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ती पुण्याला आली. पुण्यातील सिंहगड महाविद्यालयात तिने उच्च शिक्षण पूर्ण केले. अभिनयाची आवड असल्याने तिने मॉडलिंगमध्ये उतरायचे ठरवले. त्यानंतर तिने २००६ साली ‘कसम से’ या मालिकेमधून अभिनयात पदार्पण केले. तसेच २००६ साली प्रदर्शित झालेली मालिका ‘कसोटी जिंदगी की’मध्ये देखील ती झळकली होती. त्यानंतर साल २००७मध्ये ‘झलक दिखला जा’ या डान्सच्या शोमधून तिने अनेक चाहत्यांची मने जिंकली. आपल्या दमदार अभिनयासह तिने दमदार डान्सने देखील चाहत्यांच्या हृदयात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले. तसेच तिने या शोमध्ये विजय मिळवला. यावेळी तिला मोठा प्रेक्षकवर्ग आणि चाहतावर्ग लाभला. (Prachi Desai birthday no interesting things related to actor life)

‘या’ चित्रपटातून मारली बॉलिवूडमध्ये एन्ट्री
प्राचीने टीव्हीवरील मालिका आणि शोमधून खूप नाव कमावले होते. त्यानंतर तिने आपल्या अभिनयाच्या जहाजाला चित्रपटांकडे वळवले. साल 2008मध्ये तिने ‘रॉक ऑन’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बॉक्स ऑफिसवर तिचा हा चित्रपट चांगलाच चालला. त्यानंतर तिने ‘लाईफ पार्टनर’, ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’, ‘तेरी मेरी कहानी’, ‘बोल बच्चन’, ‘आय मी और मै’, ‘पोलीस गर्ल’, ‘एक विलन’, ‘अजहर’, ‘रॉक ऑन 2’, ‘कार्बन’ या चित्रपटांमधून तिने घवघवीत यश मिळवले.

‘या’ कारणावरून अजय देवगणला चांगलेच खडसावले
अभिनेत्री काही दिवसांपूर्वी अजय देवगणमुळे चांगलीच चर्चेत आली होती. अजयने ‘बोल बच्चन’ चित्रपटाच्या प्रदर्शित वर्धापन दिनानिमित्त तिच्यासह चित्रपटातील अन्य कलाकारांना टॅग केले नव्हते. अभिनेत्याच्या या गोष्टीचा प्राचीला राग आला आणि तिने एक पोस्ट शेअर केली. यामध्ये तिने लिहिले होते की, “अजय देवगण तुम्ही चित्रपटातील अन्य कलाकार म्हणजे असिन, कृष्णा अभिषेक, अर्चना पूरण सिंग, असरानी जी, नीरज वोरा आणि जीतू वर्मा यांना टॅग करायला विसरलात ज्यांनी मिळून हा उत्तम चित्रपट बनवला आहे.” तिच्या या पोस्टवरून ती चांगलीच चर्चेत आली होती.

अभिनेत्रीकडे केली होती ‘ही’ वाईट मागणी
‘एक विलन’ चित्रपटाच्या शुटिंगवेळी तिला एक आयटम गाणे करायला सांगितले होते. त्यावेळी क्रिएटिव टीमने प्राचीला हॉट दिसण्यासाठी सिलिकॉन पॅड लावण्याची मागणी केली होती. तिला या गोष्टीचा खूप राग आला. त्यानंतर तिने स्वतःला व्हॅनिटीमध्ये बंद केले होते. एकता कपूरने तिला खूप समजावले. त्यानंतर ती या गाण्याच्या शूटिंगसाठी तयार झाली.

नेपोटीजमवर देखील दिले निर्भीडपणे मत
अभिनेत्री कायमच तिला न पटणाऱ्या आणि वादग्रस्त असणाऱ्या विषयांवर आपले मत मांडते. अशात तिने नेपोटीजमवर देखील बिनधास्तपणे आपले मत मांडले होते. ती म्हणाली होती की, “नेपोटीजम हे इंडरस्ट्रीमधील वास्तव आहे. या गोष्टीला टाळून चालणार नाही. बऱ्याचशा दिग्दर्शकांना वाटायचे की मी हॉट दिसावं. काहींनी मला असे ही सांगितले होते की, तू आकर्षक दिसण्याकडे लक्ष दिले पाहिजे. पण मला हे सर्व आवडत नव्हते. त्यामुळे मी अशा चित्रपटांपासून स्वतःला दूर ठेवत होते. परंतु माझ्या विषयी असा समज पसरवला गेला की, मला अभिनयात रस उरलेला नाही. त्यानंतर मला चांगले चित्रपट मिळणे देखील बंद झाले. पण मी खुश आहे. कारण सध्या ओटीटीचे युग आहे आणि आता पर्यायांची कमी नाही.”

प्रत्येक कलाकाराकडे चुकीच्या सिनसाठी मागणी केली जाते. परंतु आपण कशात काम करावे, कशाची निवड करावी हे सर्वस्वी त्या कलाकारावर अवलंबून असते. प्राची देसाईने देखील तिला योग्य वाटलेला मार्गच निवडला.

हेही नक्की वाचा-
रणबीर कपूरचा ‘तो’ व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले; म्हणाले, ‘आता लग्नानंतर तरी…’
सई ताम्हणकरचा बोल्ड अंदाज जिंकतोय चाहत्यांची मने, Photo

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा