बॉलिवूड अभिनेत्री प्राची देसाईच्या कारकीर्दीत अनेक चढ- उतार आले आहेत. या अभिनेत्रीने वयाच्या 17 व्या वर्षी टीव्ही जगतात प्रवेश केला होता. तिने अगदी लहान वयातच पहिला बॉलिवूड चित्रपट ‘रॉक ऑन’मध्ये अभिनय केला होता. त्यावेळी ती केवळ 20 वर्षांची होती. अभिनेत्रीला तिच्या कारकिर्दीत चांगली सुरुवात मिळाली पण मध्यंतरीच ती अचानक गायब झाली.
आपल्या सौंदर्याने सर्वांना वेड लावणारी, अभिनेत्री प्राची देसाईने ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपल्याला पाहायला मिळते. नुकतीच ती मनोज वाजपेयीसोबत ‘सायलेन्स’ या वेब सीरिजमध्ये दिसली आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या कारकीर्द आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितले.
मुलाखतीत जेव्हा प्राचीला लग्नाबद्दल विचारले गेले, तेव्हा तिने लक्षवेधी प्र म्हणाली, “ज्या प्रकारे माझ्या कुटुंबीयांनी मला वाढविले आहे, त्यानुसार लग्न करणे मला सुरक्षित आणि कम्फर्टेबल वाटत नाही. जेव्हा मी माझ्या कारकीर्दीच्या वाईट टप्प्यातून जात असेल किंवा आयुष्यात काही चांगले होत नसेल, तेव्हा मी लग्न करू शकते. मी अगदी नम्र कुटुंबातून आले आहे आणि इथे पोहोचणे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.”
“मी अभिमानाने सांगू शकते की, या इंडस्ट्रीमध्ये मी एखाद्या गॉडफादरच्या मदतीशिवाय आली आहे. या इंडस्ट्रीमध्ये मी स्वतः एक स्थान निर्माण केले आहे. माझ्या कुटुंबातील सदस्यांनी माझ्या स्पेसचा आदर केला आणि मला कधीही लग्न करण्यास जबरदस्ती नाही केली, तर कोणी लग्नाचा उल्लेखही केला नाही. जेव्हा माझ्या मैत्रिणी लग्नाबद्दल बोलत असतात की, त्यांच्या घरात लग्नाबद्दल बोलणी सुरू झाली आहे, तेव्हा मला जरा आश्चर्यच वाटते. हे माझ्यासाठी थोडे विचित्र आहे, कारण माझे पालक मला याबद्दल कधी बोलत नाहीत,” असेही पुढे बोलताना ती म्हणाली.
“तसेही मी ऑनस्क्रीन खूप वेळा लग्न केले आहे. कदाचित हे आता पुरेसे आहे. कोणताही मुलगा माझ्यासाठी असेल, त्याला आतापासूनच तयार व्हावं लागेल. मला माझ्या अटींवर आयुष्य जगणे आवडते. मला माझे स्वातंत्र्य इतके आवडते की, यासाठी मी लग्नास देखील नकार देऊ शकते. काही वर्षानंतर मी लग्न करण्याचा विचार करेल. पण एक परिपूर्ण व्यक्ती माझ्या आयुष्यात आली पाहिजे,” असे लग्नाबद्दल बोलताना म्हणाली.
कामाबद्दल बोलायचे झाले, तर प्राची देसाई ‘रॉकऑन’, ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई’, ‘बोल बच्चन’, ‘तेरी मेरी कहानी’, ‘रॉकऑन 2’ आणि ‘कार्बन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. याखेरीज छोट्या पडद्याकडे वळलो, तर प्राची देसाई ‘कसम से’, ‘कसौटी जिंदगी की’ आणि ‘झलक दिखला जा’ या मालिकेचा देखील भाग राहिली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-आनंद गगनात मावेना! ‘गुड बाय’ चित्रपटात बिग बींच्या पत्नीची भूमिका साकारणार ‘ही’ अभिनेत्री