मुळशी पॅटर्नचा रिमेक ‘अंतिम’मध्ये सलमानची गर्लफ्रेड होणार ‘ही’ अभिनेत्री


सलमान खान हा बॉलीवूडचा सर्वात पॉवरफुल खान समजला जातो. सलमानचे मागचे रेकॉर्ड बघता त्याच्यासोबत पदार्पण करणाऱ्या जवळपास सर्वच अभिनेत्री ह्या इंडस्ट्रीमध्ये यशस्वी होतातच, हा याला काही अपवाद देखील आहेतच. सलमान सोबत एकदा तरी काम करायला मिळावे अशी फक्त हिंदी नाही तर संपूर्ण मनोरंजनसृष्टीतल्या अभिनेत्रीची इच्छा असते. अनेक वर्ष चित्रपटांमध्ये काम करूनही काही अभिनेत्रींना ही संधी मिळत नाही, मात्र ज्या अभिनेत्रींना त्यांचा पहिलाच हिंदी सिनेमा सलमानसोबत करायला मिळाला तर?

सध्या सलमानच्या ‘अंतिम’ सिनेमाची जोरदार हवा आहे. सलमान देखील या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. काहींना काही कारणांनी हा सिनेमा सतत चर्चेत येत आहे. कधी या सिनेमाचा टिझर आला, कधी सलमानचा त्याच्या भाचीसोबतचा डान्स व्हिडिओ आला, तर कधी सलमानचा त्याच्या बॉडीगार्ड शेरासोबतचा फोटो आला. जसेजसे सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण होत आहे, तसतशी प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल खूप उत्सुकता निर्माण होत आहे. आता या सिनेमात सलमान खानसबत रोमान्स करणाऱ्या अभिनेत्रींचे नाव समोर आले आहे. प्रज्ञा जयस्वाल असे या नशिबावन अभिनेत्रींचे नाव असून ती सलमानच्या नायिकेच्या रूपात या सिनेमात सर्वाना दिसणार आहे.

हिंदी चित्रपट रसिकांसाठी जरी हे नाव नवीन असले तरी दाक्षिणात्य चित्रपटांसाठी हे नाव ओळखीचे आहे. प्रज्ञा ही साऊथ इंडस्ट्रीमधील टॉपची अभिनेत्री असून तिने आतापर्यंत अनेक हिट सिनेमे केले आहेत. प्रज्ञाने २०१४ साली आलेल्या ‘विराट्टू आई डेगा’ या तेलगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तिने मिर्ची बॉय, फेंस, गुट्रोडु, नक्षत्रंम, जय जानकी नायक आदी हिट सिनेमे केले. प्रज्ञाला प्रचंड मोठे फॅन फॉलोविंग आहे. तिला इंस्टाग्रामवर जवळपास १९ लाख फॉलोवर्स आहे.

तसे पाहिले तर प्रज्ञाचा बॉलीवूडमधला हा दुसरा सिनेमा आहे. तिने याआधी ‘टीटू एमबीए’ नावाचा एक चित्रपट केला होता. मात्र तो सपशेल आपटला. त्यात तिच्यासोबत निशांत दाहिया मुख्य भूमिकेत होता. हा सिनेमा फ्लॉप झाल्याने तिला कुठेच लाइमलाइट मिळाले नाही. मग तिने पुन्हा साऊथ इंडस्ट्रीची वाट धरली.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, प्रज्ञाने या सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे. सिनेमातल्या महाबळेश्वर शूटिंगमध्ये तिने भाग घेतला होता. मात्र आता ही गोष्ट समजल्यामुळे प्रज्ञा चर्चेत आली आहे.

 

तत्पूर्वी या सिनेमात सलमान एका शीख पोलिस कर्मचाऱ्याची भूमिका साकारत आहे. तसेच त्याचा मेहुणा आयुष शर्मा या चित्रपटात एका गुंडाच्या भूमिकेत दिसणार आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.