Thursday, December 19, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘माझ्याशी नीट बोलायचं हं…!’ म्हणत प्राजक्ताने अतिशय हटके अंदाजात भावाला दिल्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

आपल्या आयुष्यात भावा बहिणीच्या या पवित्र नात्याला अतिशय महत्त्व आहे. रविवारी (२२ ऑगस्ट) सर्वत्र रक्षाबंधन साजरे केले जात आहे. आज सगळ्या बहिणी आपल्या भावाला ओवाळात आहेत. तसेच सोशल मीडियावर देखील अनेकजण फोटो शेअर करत आहेत. अनेक कलाकार त्यांच्या घरी रक्षाबंधन साजरे करत आहे. तसेच फोटो शेअर करून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत आहेत. यातच अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने सोशल मीडियावर तिच्या भावाचा फोटो शेअर करून अत्यंत हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

प्राजक्ताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या भावासोबत काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती तिच्या भावासोबत अत्यंत कूल अंदाजात दिसत आहे. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, प्राजक्ताने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि पँट घातली आहे. तिच्या टी-शर्टवर ‘माझ्याशी नीट बोलायचं’ अस लिहिलं आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये ती बाकी भांवडांसोबत दिसत आहे. हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “माझ्याशी नीट बोलायचं. इ. वाक्य ज्या नात्यामुळे अस्तित्वात आली. असं बहिण भावाचं अवीट गोड नातं. जगातील सगळ्या सख्ख्या-मानलेल्या भावा बहिणींना रक्षाबांधनाच्या मनापासून शुभेच्छा.” (Prajakta mali give best wishes to her brother on rakshabandhan)

प्राजक्ता आणि तिच्या भावंडांचा हा क्यूट फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण त्यांच्या या फोटोवर कमेंट करून त्यांच्या या बॉंडिंगचे कौतुक करत आहेत. तसेच हे फोटो देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

प्राजक्ता माळीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने झी मराठीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ या लोकप्रिय मालिकेमध्ये काम केले आहे. या मालिकेमधून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत तिने साध्याभोळ्या आणि सालस स्वभावाने सगळ्यांच्या मनावर राज्य केले. तसेच तिने ‘खो-खो’ या चित्रपटात काम केले आहे. ती सध्या ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या विनोदी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच तिचे ‘प्राजक्तप्रभा’ हे पुस्तक प्रदर्शित झाले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ब्यूटी क्वीन’ डिंपल हयातीला रवी तेजाने दिले वाढदिवसाचे खास गिफ्ट; शेअर केला आगामी ‘खिलाडी’चा रोमॅंटिक पोस्टर

-खण स्कर्ट घालून रुपाली भोसलेने शेअर केले ‘हटके’ फोटोशूट, मात्र सर्वत्र रंगलीय ड्रेसची चर्चा

-‘ही’ व्यक्ती आहे अंकिता लोखंडेसाठी खूप खास; फोटो शेअर करत म्हणाली, ‘तू माझ्यासाठी…’

हे देखील वाचा