चित्रपटातील अनेक कलाकारांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येकजण सोशल मीडियाचा वापर करत असतो. आता सोशल मीडिया एक देवाण-घेवाणीचे माध्यम झाले आहे. अनेक कलाकारांची ओळख तर सोशल मीडियाच्या माध्यमातून होत असते. ते नेहमीच त्यांचे वेगवेगळे व्हिडिओ किंवा फोटो सोशल मीडियावर शेअर करून सगळ्या प्रेक्षकांची जोडून राहण्याचा प्रयत्न करत असतात. सध्या चर्चेत असलेली अभिनेत्री प्राजक्ता माळीचा सोशल मीडियावरील वावर वाढताना दिसत आहे. नुकताच तिने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
प्राजक्ताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने हिरव्या रंगाचा एक लाँग ड्रेस घातला आहे. यावर तिने हातात मोत्याचे ब्रेसलेट आणि मोत्याचे कानातले घातले आहेत. यामध्ये ती दिलखुलास हसताना दिसत आहे. ज्यामध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे. (Prajakta mali share her green dress photo on social media)
हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “प्रत्येक व्यक्ती खूप सुंदर दिसते जेव्हा ते मनापासून हसत असतात. डोळे न दिसेपर्यंत हसा.” तिचा हा फोटो तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. अनेकजण या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. तिच्या एका चाहत्याने “दीवाना कर रहा है तेरा रूप सूनहेरा,” अशी कमेंट केली आहे. दुसऱ्या एका चाहत्याने “काय गोड दिसतेस प्राजू,” अशी कमेंट केली आहे. आणखी एकाने कमेंट केली आहे की, “हसण्याचे एक कारण म्हणजे प्राजक्ता.” आणखी एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “मी पौर्णिमेचा चंद्र बघणं सोडून देणार आहे. आई शप्पथ… खोटं वाटतं, बरं तुझी शप्पथ.”
प्राजक्ता माळीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने झी मराठीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ या लोकप्रिय मालिकेमध्ये काम केले आहे. या मालिकेमधून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. या मालिकेतील तिच्या साध्याभोळ्या आणि सालस स्वभावाने सगळ्यांच्या मनावर राज्य केले. तसेच तिने ‘खो-खो’ या चित्रपटात काम केले आहे. ती सध्या ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या विनोदी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच तिचे ‘प्राजक्तप्रभा’ हे पुस्तक प्रदर्शित झाले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘या’ क्लोथिंग ब्रँडचा मालक आहे करणवीर बोहरा; वडील अन् आजोबांचेही होते चित्रपटांशी नाते
-‘इथे सूर्यप्रकाश येतोय…’, म्हणत अनन्या पांडेने शेअर केले घायाळ करणारे ‘ब्लॅक ऍंड व्हाईट’ फोटोशूट
-कंगनासोबत ब्रेकअपनंतर तुटून गेला होता अध्ययन; वडील शेखर यांच्या ‘या’ सल्ल्याने दिली त्याला हिंमत