मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आणि डान्सर म्हणजे प्राजक्ता माळी. सध्या प्राजक्ता तिच्या अनेक गोष्टींमुळे चर्चेत असते. नुकतेच रविवारी (८ ऑगस्ट) प्राजक्ताने तिचा वाढदिवस साजरा केला आहे. यानिमित्त तिला अनेकांनी तिच्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच ती दर्शकांसाठी आणि वाचकांसाठी एक खास भेट घेऊन आली आहे, ज्याची माहिती तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या कविता संग्रहाची ही पहिली आवृत्ती प्रदर्शित झाली होती. अशातच तिच्या वाढदिवशी या कविता संग्रहाची दुसरी आवृत्ती प्रदर्शित झाली आहे.
प्राजक्ताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने देव्हाऱ्यात एक पुस्तक ठेवलेले दिसत आहे. या पुस्तकावर ‘प्राजक्तप्रभा’ असे लिहिले आहे. तसेच पुस्तकावर तिचा फोटो देखील दिसत आहे.
हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “वाढदिवसाच्या मुहूर्तावर प्राजक्तप्रभाची दुसरी आवृत्ती बाजारात आली आहे. काल तुम्ही वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव केलात. आभारासाठी शब्द अपुरे पडतायेत. आई शप्पथ सांगते, तुमच्या प्रेमामुळे तग धरून आहे सदैव ऋणात.” या पोस्टनंतर आता वाचक खूप खुश झाले आहेत. अनेकजण तिच्या या पोस्टवर कमेंट करत आहेत.(prajakta mali share her photo with her book on social media )
ग्रंथाली प्रकाशित या काव्य संग्रहाचे प्रकाशन जेष्ठ साहित्यिक, गीतकार आणि कवी असलेल्या प्रवीण दवणे यांच्या हस्ते करण्यात आले होते.
प्राजक्ता माळीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने झी मराठीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ या लोकप्रिय मालिकेमध्ये काम केले आहे. या मालिकेमधून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. या मालिकेतील साध्याभोळ्या आणि सालस स्वभावाने सगळ्यांच्या मनावर राज्य केले. तसेच तिने ‘खो-खो’ या चित्रपटात काम केले आहे. ती सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा या विनोदी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘महाराष्ट्राचा बहुरंगी, बहुढंगी तमाशा’, सोनाली कुलकर्णीच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
-‘अब क्या कहे क्या नाम ले…’, म्हणत अंकिता लोखंडेने लावले जोरदार ठुमके; डान्स व्हिडिओ व्हायरल
-व्हिडिओ: टायगर श्रॉफने गायलेल्या पहिल्या हिंदी गाण्याचा दमदार टिझर प्रदर्शित










