Monday, July 8, 2024

आनंद, समाधान, धाकधूक, नवंकाहितरी प्राजक्ता माळीची ‘ती’ पोस्ट तुफान चर्चेत

प्राजक्ता माळी मराठी इंडस्ट्रीमधील अतिशय सुंदर, अभ्यासू आणि फिटनेस फिक्र असलेली अभिनेत्री आहे. ती नेहमीच तिच्या सोशल मीडियाच्या पोस्टच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात असते. विविध पोस्ट शेअर करत ती नेहमीच तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याची माहिती देत असते. मागील बऱ्याच काळापासून प्राजक्ताच्या लग्नाच्या चर्चाना उधाण आले आहे. मराठीमध्ये मालिका, चित्रपट, नाटक आदी सर्वच माध्यमांमध्ये काम करणाऱ्या प्राजक्ता माळीची एक एक पोस्ट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

प्राजक्ताने सोशल मीडियावर एक हिंट दिली होती की, तिच्या चाहत्यांसाठी काहीतरी खास घेऊन येणार आहे. मात्र ते काय असेल हे तिने सरप्राईज ठेवले आहे. याच पार्श्वभूमीवर तिने पुन्हा एकदा एक पोस्ट शेअर केली असून त्यात एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक स्त्री मोरपंखी रंगाची साडी नेसून (कदाचित प्राजक्ताच) पायात पैंजण घालून पायऱ्या उतरत आहे. व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला एक संगीत देखील वाजत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले, ““नक्कीच साखरपुडा अथवा लग्न नाही. त्यासाठी “वाट बघा”. इन्स्टा लाइव्हवर उद्या ५.३० वाजता भेटूया. नक्की या.” यासोबतच तिने #आनंद #समाधान #धाकधूक #नवंकाहितरी असे हॅशटॅग देखील दिले आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

तिच्या या पोस्ट नेटकऱ्यांची आणि तिच्या फॅन्सची उत्सुकता अधिकच वाढवत आहे. मात्र लवकरच प्राजक्ता तिचा एक दागिण्याचा ब्रँड लाँच करणार असल्याचे समजत आहे. ‘प्राजक्तराज’ असे तिच्या ब्रँडचे नाव असून, तिच्या या ब्रँडचे उदघाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार आहेत.

‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहचली. त्यानंतर तिने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले. सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोचे सूत्रसंचालन करत आहे. एक अभिनेत्री असण्यासोबतच प्राजक्ता उत्कृष्ट नृत्यांगणा देखील आहे. प्राजक्ताने भूमिका साकारलेल्या ‘रानबाजार’ या वेब सीरिजमधील तिच्या भूमिकेवर प्रचंड चर्चा झाली होती.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘शार्क टँक इंडिया’ची जज आहे ‘एवढ्या’ कोटींची मालकीण; वर्षाकाठी कमावते पैसाच पैसा

‘अवतार 2’ने मारलं भारतीय बॉक्स ऑफिसचं मैदान, नुकत्याच हिट झालेल्या सिनेमाला पछाडत कमावले ‘एवढे’ कोटी

 

 

हे देखील वाचा