उत्तम अभिनेत्री, नृत्यांगना, कवियत्री आणि फिटनेसप्रेमी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. मालिकेतून घराघरात पोहचलेल्या प्राजक्ताने तिच्यातील विविध कलागुणांना प्रेक्षकांसमोर आणले आहे. ती जे काम हाती घेते ते पूर्ण करतेच आणि त्यात यशस्वी देखील होतेच. अभिनयात तर प्राजक्ताने प्रेक्षकांवर तिची छाप सोडलीच आहे. रोमॅंटिक भूमिकांपासून ते बोल्ड आणि खलनायकी भूमिका देखील तिने तितक्याच ताकदीने साकारल्या आहेत. २०२२ मध्ये प्राजक्ताने रोमॅंटिक, बोल्ड आणि खलनायकी भूमिक साकारल्या तर तिचा ‘प्राजक्तप्रभा’ हा कविता संग्रह देखील प्रकाशित झाला.
प्राजक्ता माळीसाठी २०२३ हे वर्ष खूपच खास आहे. यावर्षीच्या सुरुवातीसच तिने तिचा ‘प्राजक्तराज’ नावाचा दागिन्यांचा ब्रँड लाँच केला. आता तिला या वर्षातला पाहिला पुरस्कार देखील मिळाला आहे. नुकताच ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?’ हे पुरस्कार संपन्न झाले. यात प्राजक्ताला सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार मिळाला आहे. ‘पांडू’ सिनेमात प्राजक्ताने खलनायिकेची भूमिका साकारली होती. त्याच भूमिकेसाठी तिला हा पुरस्कार देण्यात आला.
View this post on Instagram
प्राजक्ताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे. तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “कष्टाचं चीज व्हायला सुरूवात झाली असं म्हणायला हरकत नाही…बक्षिस…भरभरून votes दिल्याबद्दल सबंध महाराष्ट्राचे मनापासून आभार. असचं अविरत प्रेम आणि अखंड पाठिंबा आणि आशिर्वाद असू देत, हीच विनंती. मला खलनायिका म्हणून मिळेल काम करायला मिळेल असं कधीही वाटलं नव्हतं, त्यात हा पुरस्कार मिळाला.. त्यामुळे विशेष आनंद… माझे सर्व सहकलाकार, तंत्रज्ञ, टीम पांडू आणि ज्यांनी मला ह्या भूमिकेसाठी निवडल ते म्हणजे विजू माने ह्यांचे विशेष आभार.”
तत्पूर्वी प्राजक्ताने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. मागच्यावर्षी आलेल्या ‘रानबाजार’ या सिरीजमध्ये तिने साकारलेल्या बोल्ड भूमिकेची तुफान चर्चा झाली होती. प्राजक्ता खऱ्या अर्थाने अष्टपैलू अभिनेत्री आहे. ती सतत नवनवीन प्रयोग करताना दिसते. सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसत आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मोठ्या दणक्यात सुरु आहे प्रभासच्या आगामी ‘सालार’ सिनेमाची शूटिंग, समोर आले फोटो
मोठी बातमी! बॉलिवूडमधील ज्येष्ठ चित्रपट निर्माता महेश भट्ट यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया, प्रकृती गंभीर…