बिकिनीमध्ये योगा केल्याने ट्रोल झाली ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री; युजर्स म्हणाले, ‘कपडे घालून…’


आज २१ जून रोजी, जागतिक योगा दिन सर्वत्र मोठ्या उल्हासात साजरा केला जात आहे. अगदी सामान्य व्यक्तींपासून ते मोठमोठ्या कलाकारांपर्यंत सर्वचजण हा दिवस साजरा करताना दिसत आहेत. कलाकारांनी सोशल मीडियावर आपले योगा करतानाचे फोटो शेअर करून, चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. हे फोटो पाहून नेटकरी त्यांचे कौतुकही करत आहेत. मात्र एक अभिनेत्री अशी आहे, जिचा फोटो पाहून तिला ट्रोल केले जात आहे.

ही अभिनेत्री आहे मराठमोळी प्राजक्ता शिंदे. ती खासकरून तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. बऱ्याचदा ती तिचे बोल्ड आणि मादक फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना घायाळ करते. हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होत असतात. आता अभिनेत्रीने योगा देखील बिकिनीमध्येच केला आहे. हेच कारण आहे, ज्यामुळे तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जात आहे.

प्राजक्ताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यात ती काळ्या रंगाची बिकिनी घालून योगा करताना दिसली आहे. हा फोटो शेअर करत तिने योगदिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. मात्र या प्रकारे शुभेच्छा दिल्यामुळे अभिनेत्री आता ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. यावर एका युजरने तिला विचारले आहे की, “योगा करताना कपडे घालायची परवानगी नसते का?” तर दुसरा युजर म्हणतोय, “कपडे घालून पण योगा करता येतो.” तर काहींना तिचा हा बोल्ड अंदाज आवडल्याचे दिसून येत आहे. (prajakta shinde wear bikini while doing yoga got trolled)

प्राजक्ताच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ती मराठी चित्रपटामध्ये छोट्या छोट्या भूमिका साकारताना दिसली आहे. शिवाय आता ती ‘ईमेल फिमेल’ चित्रपटात महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. यातही ती अतिशय बोल्ड अंदाजात दिसणार आहे. चित्रपटात बोल्ड दिसणारी अभिनेत्री खऱ्या आयुष्यातही तितकीच बोल्ड आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तिरंगा’ चित्रपटासाठी नानांनी दिला होता नकार; मात्र नंतर ‘ही’ विचित्र अट सांगत भरली त्यांनी हामी

-कपिल शर्माच्या शोमध्ये भोजपुरीच्या सुूपरस्टार्सची धमाल; तर कपिल शर्माचीही बोलती झाली बंद

-‘ही’ गोष्ट अधिक प्रिय असल्यामुळे, बॉलिवुड पार्ट्यांमध्ये जाणे टाळतो अक्षय कुमार; अभिनेत्याने स्वत: केला होता खुलासा


Leave A Reply

Your email address will not be published.