मराठी सिनेमा जगतातील अनेक अभिनेत्री आपल्या अभिनयाबरोबरचं सोशल मीडियावरही नेहमीच चर्चेत असतात. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन त्या नेहमीच नवनवीन फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. सध्या अभिनेत्री प्राजक्ता माळीची (Prajkta Mali) अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिची मनमोहक अदा असलेला फोटो पाहायला मिळत आहे. सध्या तिच्या या व्हायरल फोटोची आणि त्याला दिलेल्या भन्नाट कॅप्शनची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, मराठी चित्रपट जगतातील सोज्वळ अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीचे नाव घेतले जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने तिने सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे असंख्य चाहते आपल्याला पाहायला मिळतात. अभिनयाइतकीच ती सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते. यावरुन ती आपल्या चाहत्यांशी अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सध्या तिचा असाच एक फोटो सर्वत्र व्हायरल होत आहे. ज्यामधला तिचा लूक पाहून चाहते चांगलेच फिदा झाले आहेत.
हा फोटो प्राजक्ताने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केला आहे. ज्यामध्ये ती केस मोकळे सोडून मनमोहक पोज देताना दिसत आहे. मोकळे केस, हलकासा मेकअप आणि करारी नजर यामुळे तिचे सौंदर्य खूपच खुलून दिसत आहे. फोटोसोबत तिने “बाबूजी धिरे चलना, प्यार में जरा…,” असा लक्षवेधक कॅप्शन दिला आहे. हा खास कॅप्शन कोणासाठी आहे याचीच चर्चा आता तिच्या चाहत्यांमध्ये रंगली आहे.फोटोवर तिच्या चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री प्राजक्ता सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये झळकत आहे. याआधीही तिच्या अनेक मालिकांचे प्रेक्षकांनी कौतुक केले होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-