Saturday, July 6, 2024

‘मी एकटीच का?’, स्वतःचेच मीम्स व्हायरल झाल्याने अभिनेत्री प्राजक्ता माळीने नेटकऱ्यांना केला स्पष्ट सवाल

मराठी सिने जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या अभिनयाइतक्याच सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतात. यामध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळीचे (Prajkta Mali) नाव सर्वप्रथम घेतले जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने सिने जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी प्राजक्ता सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. यावरुन ती आपल्या चाहत्यांशी अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सध्या प्राजक्ताची अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने मी एकटीच का असा थेट प्रश्न आपल्या चाहत्यांना विचारला आहे. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ. 

प्राजक्ता माळी ही मराठी सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अलिकडेच प्राजक्ताची रानबाजार वेबसिरीज प्रचंड गाजली होती. या सिरीजमधील प्राजक्ताच्या अभिनयाने आणि बोल्ड लूकने सर्वांचेच लक्ष वेधले होते. तसेच तिच्या अभिनयाचेही प्रचंड कौतुक झाले होते. आपल्या अभिनयाइतकीच सोशल मीडियावरही सक्रिय असलेल्या प्राजक्ताची एक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. ही पोस्ट शेअर करत प्राजक्ताने “मी एकटीच का? तुम्हीही आनंद घ्या,” असा कॅप्शन दिला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

 

प्राजक्ताची ही पोस्ट खूपच गमतीशीर आहे. ज्यामध्ये तिने सोशल मीडियावर व्हायरल झालेले तिचेच मिम्स शेअर केले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या मेममध्ये थेट अभिनेत्री प्राजक्ता माळीवरच मजेशीर मेम्स तयार करण्यात आले आहेत. ज्यामध्ये ती पुण्यात असल्यावर आणि ती घरी आल्यावर असे म्हणत प्राजक्ताचेच फोटो कोलाज केले आहेत. प्राजक्ताचे हे व्हायरल फोटो पाहून नेटकऱ्यांनीही चांगलीच मजा घेतली आहे. दरम्यान अभिनेत्री प्राजक्ता माळीने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये तसेच चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकतेच प्राजक्ताचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. ज्यामध्ये तिचा नो ब्लाऊज लूक पाहायला मिळाला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा –

चाळिशीत अभिनेत्रीचा हॉट अंदाज आला समोर, साडीतील ‘हे’ फोटो वेधतायत लक्ष

सैफचा मुलगा करतोय अर्जुन रामपालच्या लेकीला डेट? व्हायरल फोटोवरून सोशल मीडियावर रंगली एकच चर्चा

‘बजरंगी भाईजान’च्या सिक्वेलमध्ये होणार ‘हे’ मोठे बदल, लेखकाने कथेशी संबंधित केला मोठ्ठा खुलासा

हे देखील वाचा