मागील एक वर्षापासून भारत कोरोनाच्या कचाट्यात सापडला आहे. या वर्षी तर भारताची परिस्थिती खूपच बिकट झाली आहे. रुग्णसंख्येसह मृत्युची संख्याही वाढत आहे. अनेक सोयी- सुविधांचा अभाव जाणवत आहे. अनेकजण या संकटांतून भारताला बाहेर काढण्यासाठी मदत करत आहेत. परदेशातून देखील मदतीचा हात पुढे आला आहे. अनेक कलाकार आणि खेळाडू देखील मदतीला धावून आले आहेत. जो तो ज्याच्या त्याच्या परीने मदत करून लवकरात लवकर देशाला या संकटातून बाहेर कसे काढता येईल याचा विचार करत आहे. अशातच बॉलिवूडमध्ये खलनायकाची भूमिका साकारून लोकप्रिय झालेले अभिनेते प्रकाश राज यांनीदेखील गरजूंना मदत केली आहे.
ही माहिती त्यांनी ट्विटरवरून सांगितली आहे तसेच इतर इतरांनाही मदत करण्याचे आवाहान केले आहे. प्रकाश राज यांनी ट्विटरवर तीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ते लोकांची मदत करताना दिसत आहे.
Reaching out to my neighbours..Empowering with Food kit to panchayat sanitary workers and cooked food to daily wage workers stuck in this lockdown through STS foundation.. ???????????????????????? please find a way reach out to the ones around you TOGETHER WE STAND #JustAsking pic.twitter.com/vJnn47y9Ye
— Prakash Raj (@prakashraaj) May 15, 2021
हे फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “शेजाऱ्यांपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. या लॉकडाऊनच्या काळात एसटीएस फाऊंडेशनच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांना जेवण देऊन त्यांना सशक्त बनवण्याची जबाबदारी घेतली आहे. तुम्ही देखील तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींना मदत करा. आपल्याला सगळ्यांना एकत्र काम करायचे आहे.”
त्याच्या या पोस्टवर त्याचे चाहते प्रतिक्रिया देऊन त्याचे कौतुक करताना दिसत आहे. एका युजरने कमेंट करून लिहिले आहे की, “जिथे तंत्र पोहोचू शकले नाही, तिथे प्रकाश राज पोहोचले.”
मागील काही दिवसांमध्ये एका मंदिरात पूजेसाठी महिलांची खूप गर्दी झाली होती. त्यावेळी प्रकाश राज यांनी या गर्दीचा व्हिडिओ शेअर करून ट्वीट केले होते की, ‘गो कोरोना गो.’ प्रकाश राज यांनी सिंघम या चित्रपटात जयकांत शिखरे ही खलनायकी भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांच्या लोकप्रियतेमध्ये कमालीची वाढ झाली.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘हे कोणाचे मूल हरवले?’, कार्तिक आर्यनने तोंड काळे झालेला फोटो केला शेअर; नेटकऱ्यांनी घेतली मजा
-‘द कपिल शर्मा शो’मधील ‘ही’ अभिनेत्री आहे बेरोजगार; दीर्घकाळापासून लढतेय महाकाय आजाराशी