Wednesday, June 26, 2024

मुलाच्या आनंदासाठी प्रकाश राज यांनी पुन्हा केले लग्न; फोटो भन्नाट व्हायरल

कलाकार आपल्या विवाहिक आयुष्यात अनेकदा घटस्फोट घेतात. एकदा घटस्फोट घेतल्यानंतर दुसरे लग्नही करतात, त्यामुळे कलाकार एकही लग्न टिकवू शकत नाहीत, असा अनेकांचा समज आहे. परंतु हाच समज बदलण्यासाठी अभिनेता प्रकाश राज यांनी लग्नाचा वाढदिवस पुन्हा लग्न करत साजरा केला आहे. पोनी वर्मा ही प्रकाश राज यांची दुसरी पत्नी असून त्यांनी तिच्याबरोबर आता पुन्हा विवाह केला आहे.

प्रकाश राज हे चित्रपटसृष्टीमध्ये बॉलिवूड तसेच साऊथ चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असतात. अशात त्यांच्या मुलाने त्यांचे लग्न पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांनी आपल्या लग्नाच्या ११व्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा लग्न केले. त्यांनी त्यांच्या लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. त्यांनी कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “आज रात्री आम्ही पुन्हा एकदा विवाह केला आहे. कारण आमच्या मुलाला वेदांतला आमचे लग्न पाहायचे होते… कौटुंबिक क्षण.” मंळवारी (२४ ऑगस्ट) त्याच्या लग्नाचा वाढदिवस होता. (Prakash Raj got married again to show his son, let’s see viral photos)

त्यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवसाआधी देखील एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तो फोटो त्यांच्या पत्नीबरोबरचा होता. हा फोटो पोस्ट करत त्यांनी त्यांच्या पत्नीचे आभार मानले आहेत. प्रकाश राज म्हणाले की, “हे सर्व खूप छान होतं. खूप खूप धन्यवाद माझी डार्लिंग माझी पत्नी. तू माझी एवढी चांगली मैत्रीण म्हणून माझ्या बरोबर राहिलीस, तू माझी प्रेमिका आणि जीवनसाथी म्हणून माझ्याबरोबर राहिलीस त्यासाठी धन्यवाद.”

प्रकाश यांच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाले, तर त्यांनी साऊथ इंडस्ट्रीबरोबरच बॉलिवूडमध्येसुद्धा लाखो चाहते कमावले आहेत. त्यांनी ‘हिटलर’ या चित्रपटातून १९९८ मध्ये सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले. ‘इंद्रप्रस्थम’, ‘बन्धनम’, ‘वीआईपी’, ‘नंदनी’, ‘शांति शांति शांति’, ‘वन्नावली’, ‘आजाद’, ‘गीता’, ‘ऋषी’, ‘दोस्त’, ‘सिंघम’, ‘वाँटेड’, ‘बुड्ढा होगा तेरा बाप’, ‘हीरोपंती’, ‘एन्टरटेन्मेंट’, ‘मुरारी’, ‘इंद्रा’, ‘इडियट’, ‘शक्ति: द पावर’, ‘फूल्स’, ‘गंगोत्री’, ‘स्मार्ट द चॅलेंज’, ‘पोकरी’, ‘राणा’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘पोन्नियन सेलवन’ सिनेमातील ऐश्वर्याचा फोटो लीक; अभिनेत्री दिसली ‘या’ अवतारात

-तब्बल ३६ वर्षांपूर्वी ‘या’ जाहिरातीत दिसला होता ‘भाईजान’; हँडसम लूक पाहून चाहते नव्याने पडतायेत प्रेमात

-अपारशक्ती खुराणा लवकरच होणार बाबा, शेअर केला पत्नीच्या डोहाळे जेवणाचा सुंदर व्हिडिओ

हे देखील वाचा