Tuesday, March 5, 2024

‘मी मोदींचा टीकाकार असल्यामुळे अनेक पक्ष मला उमेदवार बनवू इच्छितात’, प्रकाश राज यांचा मोठा दावा

साउथच नाही तर बॉलिवूडमध्ये आपल्या आपल्या अभिनयाची छाप सोडणारे अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) त्यांच्या वक्तव्यामुळे कायम चर्चेत असतात. अश्यातच तीन राजकीय पक्षांनी २०२४च्या लोकसभा निवडणुकीत उमेवारी देण्याची तयारी दर्शवली आहे. राजकीय पक्ष विचारधारेसाठी नाही तर, मोदींचा आलोचक (टिकाकार) असल्यामुळे माझ्यासोबत येण्याचा प्रयत्न करत आहे. असा दावा अभिनेते प्रकाश राज यांनी केला आहे.

केरळमध्ये झालेल्या साहित्य संमेलनात बोलतांना प्रकाश राज म्हाणाले, “येत्या लोकसभा निवडणुकांसाठी तीन राजकीय पक्ष उमेदवारीसाठी माझ्या मागे लागले आहे. जनतेसाठी नाही तर माझ्या विचारधारेसाठी हे राजकीय पक्ष माझ्याकडे येत आहे.पण मला आता यात पडापयचे नाही. म्हणून मी फोनसुद्धा बंद करुन ठेवला आहे.

राजकीय पक्ष त्यांचा स्वतःचा आवाज विसरत चालले आहे. त्यांच्यात आता खरेपणाच शिल्लक राहिलेला नाही. आणि म्हणुनच त्यांना चांगले उमेदवार मिळत नाही. त्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागतो आहे.

पुढे ते म्हणाले, “मी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) घ्रुणा करत नाही. ते काही माझे सासरे नाही किंवा माझा त्यांच्यासोबत काही संपत्तीचा मुद्दा नाही. मी एक करदाता आहे मी माझे पैसे दिले आहेत. त्यामुळे प्रश्न विचारणे माझे काम आहे. त्यांनी एक्सवर केलेल्या पोस्टवर ते म्हणाले, “मी जनतेच्या मनातजे आहे तेच बोलतो. हा फक्त माझा नाही तर जनतेचा आवाज आहे. पुढे एक्सवर केलेल्या पोस्टवर ते म्हणाले, “ही माझी मन की बात नाही, तर सर्व जनतेच्या मनातील मन की बात आहे. सत्तेत असलेल्यांना प्रश्न विचारण्याची गरज आहे. मग मी त्यांना मत दिलं असो वा नसो.”

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

अभिषेक बच्चनसोबतच्या मतभेदाच्या बातमीवर ऐश्वर्या रायने सोडले मौन, पतीला म्हणाली…
‘अशी’ झाली रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांच्या प्रेमाला सुरुवात, अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा

हे देखील वाचा